नांदेड : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशव्दारात लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रिलमध्ये एका व्यक्तीचा पाय अडकल्याची गंभीर घटना गुरूवारी दुपारी घडली. तब्ब्ल अर्धा तासाच्या परिश्रमानंतर महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने त्या व्यक्तीची सुटका केली.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये काम करणारे गोविंद पौळ वय ५२ हे व्यक्ती गुरूवारी दुपारी काही कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पायी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी होता. गोविंद पौळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावरील लोखंडी ग्रीलवर पाय ठेवला, तोच त्यांचा पाय घसरुन लोखंडांच्या दोन पाईपमध्ये अडकला.
त्यांचे सहकारी आणि इतरांनी त्यांना बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र पौळ यांचा पाय बाहेर काही निघेना. अखेर महापालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमनच्या कर्मचा-यांनी अर्धा तासाच्या परिश्रानंतर या दोन लोखंडी पाईपमधील एक पाईप कापून पौळ यांची सुटका केली.