32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeनांदेडविहिरीत पडलेल्या कोल्ह्यास दिले जीवदान

विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास दिले जीवदान

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा तालुक्यातील मौजे देऊळगाव येथे विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास वनरक्षक लक्ष्मण शेळके यांनी स्वत: विहिरीत उतरून बाहेर काढून जीवदान दिल्याने वनविभागाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. तालुक्यातील देऊळगाव येथील गणेश राऊत यांच्या मालकी विहिरीत पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ निघालेला कोल्हा पडला ही घटना वन विभागाचे वनरक्षक लक्ष्मण शेळके यांना कळवण्यात आली.

वनरक्षक शेळके यांनी विशिष्ट पथकाद्वारे सामग्री घेऊन स्वत: विहिरीत उतरून बाजेचा झुला करून या झुल्यावर बसवून वन्यजीव कोल्हा याचे प्राण वाचवले. देऊळगाव ता. लोहा येथील पोलिस पाटील गणेश राऊत यांच्या मालकीच्या विहीरी मध्ये कोल्हा हा वन्यप्राणी पडला असता वन्यजीव रक्षक च्या मदतीने विहिरीत पडलेल्या बोलल्यास दो्नैया खाट पिंजरा अशी सामुग्री वाहण्यात आली पाण्यात पडल्यानंतर जीव रक्षण करण्यासाठी त्याने खडकाची मदत घेतली अशा परिस्थितीत खडकावरून त्याला बाहेर काढण्यासाठी मोठे कष्ट करावे लागले.

आर. ए. सातेलिकर उपवनसंरक्षक नांदेड ,. डी. एस.पवार सहाय्यक वनसंरक्षक नांदेड, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवले ,वन परिमंडळ अधिकारी अशोक क्यादरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लक्ष्मण शेळके यांनी तत्काळ घटनस्थळी साफळा रचला.आणि कोल्हा या प्राण्यास जीवनदान दिले म्हणून सर्वत्र अभिनदन होत आहे. मदत पथकात गणेश राऊत, बालाजी राऊत,गणेश पांचाळ, मुंजाजी राऊत, वैभव राऊत, शंशिकांत नांदेडकर, नारायन लोखंडे यांंचा समावेशआहे.

मंगळस्वा-यांना गती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या