30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home नांदेड लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनामे करून मदत करून नुकसानभरपाई...

लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनामे करून मदत करून नुकसानभरपाई द्यावी – खासदार प्रताप पाटील चिखलीकर

एकमत ऑनलाईन

लोहा (युनूस शेख) : मागील काही दिवसांपासून लोहा व कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले होते .वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले सोयाबीन, ज्वारी ,मूग, उडीद ,कापूस,ऊस आदी सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,६५ टक्के सरासरी पाऊस झालेल्या गावांचे सरसगट पंचनामे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई तात्काळ देण्याची मागणी लोहा, लोकप्रिय, कर्तव्यदक्ष खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे

त्यावर तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करण्याचे काम चालू करा असे सांगण्यात आलेआहे. यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला असता , तहसीलदार विठ्ठल परळीकर व कंधार चे तहसीलदार मांडवगडे यांना अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने नुकसान ग्रस्त झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते . लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर व कंधार चे तहसीलदार मांडवगडे यांनी महसूल विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी यांना अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या लोहा व कंधार तालुक्यातील शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतीचे पंचनामे करण्यास महसूल विभागाच्यावतीने प्रत्यक्ष सुरुवात झालेली असल्याने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वेळोवेळीच्या पाठपुराव्याला यश आले असून, लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोहा तालुक्यात ढगफुटी अनेक गावांचा संपर्क तुटला, घरांचीही पडझड, शेकडों हेक्टर शेती खरडली ; पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. लोहा तालुक्यात यंदा पहिल्यांदाच परतीच्या पावसाने उग्ररूप धारण केल्याचे दिसून आले. तालुक्यात सर्वदूर अक्षरशः ढग फुटी झाल्याचा प्रत्यय आला. तालुक्यातील अनेक गावांचा नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक गावांशी संपर्क तुटला होता. नदी काठी असलेल्या गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्न धान्याचे नुकसान झाले. तर पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेकडों हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.

यावर्षी अद्याप पर्यंत मोठा पाऊस झाला नसला तरी पिकयोग्य जमिनीत मुरणारा पाऊस झाल्याने पिके उत्तम अवस्थेत होती. तसेच सर्व धारण तलाव फुल्ल झाले आहेत. परंतु यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील उत्तर भागातील नदी-नाल्या खळखळून वाहिल्या. बेरळी, देऊळगाव, चितळी, हिप्परगा, हळदव, धानोरा (म), खांबेगाव, आडगाव, बोरगाव, पांगरी, पेनूर, शिवणी (जा), आदी सह इतर भागात जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यावर पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

बार्शीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता तात्काळ ४०० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करा – ॲड.राजर्षी तलवाड-डमरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या