34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडपुन्हा लॉकडाऊन; नागरीक वैतागले

पुन्हा लॉकडाऊन; नागरीक वैतागले

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्हाधिकारी डॉ विपिन यांनी दिलेल्या आदेशानुसार नुसार २४ मार्च पासून ४ एफ्रील पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती दहा दिवस कडकडीत बंद पाळल्यानंतर रविवारी काही नियम शिथिल करण्यात आले होते मात्र सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवार पासून ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पुन्हा लॉगडाऊन सुरू करण्यात आले आहे त्या मुळे सर्व सामान्य नागरिकासह व्यापारी वैतागले आहेत.

दहा दिवस कडकडीत बंद पाळल्याणतर सोमवारी बाजारपेठ सुरू झाली होती नागरीकाची वर्दळ वाढली होती बाजारपेठ पुर्वपदावर आली होते. कोरोना विसाणुला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपिन यांनी दिलेल्या आदेशानुसार नुसार जिल्ह्यात अनेक निर्बंध घातले आहेत कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे नियम शिथिल करण्यात आले आहेत मात्र बिनाधास्थ राहु नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे असे आदेश रविवारी जारी करण्यात आले होते सर्वसामान्य भाविकांना दिलासा मिळाला होता.

कोरोनाविषाणूचे संकटं वाढले हे खरे असले तरी सर्व सामान्य नागरिकासह व्यापारी लॉकडाऊन वैतागले आहेत मंजुरी मिळत नाही भुकबळी होण्याची भिंती निर्माण झाली आहे. एक वषार्पासून नागरीक लॉकडाऊन चा सामना करीत आहेत व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत अशी भयानक परिस्थिती असताना पुन्हा लागडाऊणचा खेळ सुरू झाला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आली असून जयंती उत्सव घरीच साजरा करण्यासाठी बाजारात खरेदी साठी नागरीकानी गर्दी केली होती मात्र पुन्हा मंगळवार पासून आवश्यक सेवा वगळता लागडाऊण सुरू केले आहे त्या मुळे सर्व सामान्य नागरीकांनाचा हिरमोड झाला आहे.

फोडणीला महागाईचा तडका ; गृहिनीचे किचन बजेट कोलमडले

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या