नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गत वर्षांपासून लॉकडाऊनची स्थिती राहिली आहे. या काळात देशातील असंख्य लोकांचे रोजगार गेले, याकाळात अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. तर पुन्हा एकदा राज्य सरकारने मिशन ब्रेक दी चैन च्या नावाखाली राज्यात कडक निर्बंध लागू केल्याने व्यापारी पुन्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे. दरम्यान शासनाने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व्यापा-यांना आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील व्यापा-यांनी केली आहे.
सततच्या लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. सतत लॉकडाऊनमुळे व्यापार, उद्योग, व्यवसाय बंदच आहेत. बाजारपेठेत आर्थिक उलाढाल बंद असल्याने अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठ बंद, व्यापार बंद, उद्योग धंदे बंद यामुळे असंख्य लोकांचे रोजगार गेले आहेत. सततच्या लॉकडाऊनमुळे लोकांपुढे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच प्रश्न आवासून उभा आहे. तर मागच्या वर्षभरापासून व्यवसाय ठप्प असलेला व्यावसायिकही आता पार अडचणीत आला आहे. त्यांच्या पुढे आता दुकान भाडे, मजुरांचे पगार, वीजबिल, टॅक्स, जीएसटी हे प्रश्न व्यापा-यांपुढे आवासून उभे आहेत. त्यांचा व्यवसायच जर लॉकडाऊनमध्ये बंद होता तर त्यांच्याकडे पैसे येणार तरी कुठून? याचा मात्र सरकारला विसर पडल्याचे दिसून येते.
याबाबत अनेकदा व्यापा-यांनी व छोट्या व्यावसायिकांनी आर्थिक मदत, टॅक्समध्ये सूट मिळावी यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र त्याला यश काही आले नाही. जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक या लॉकडाऊनच्या काळात देशोधडीला लागले. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक आर्थिक विवंचनेत आहेत. तर अद्यापही राज्यासह जिल्ह्यात अनेक गोष्टींवर निर्बंध कायम असुन जीएसटी चालू, सेल्स टॅक्स चालू, दुकान भाडे चालू हे सर्व गोष्टी चालूच आहेत. तर सरकारकडून सध्या कडक निर्बंध म्हणुन ब्रेक दी चैनच्या नावाखाली पुन्हा एकदा अघोषित लॉकडावूनच लागू करण्यात आला असल्याचे व्यापा-यांतुन बोलल्या जात आहे. परंतू लॉकडाऊन पुर्णत: उठवल्याचे अद्यापही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र मागच्या वर्षभरात लॉकडाऊन काळात जे व्यापा-यांचे आर्थिक नुकसान झाले त्याचे काय? अनेकांचे व्यवसाय बंद पडले त्याचे काय? याच विवंचनेत व्यापारी आहेत.
आता शासनानेच या महत्वाच्या प्रश्नाला हात घालत या छोट्या व्यावसायिक, व्यापा-यांना पुन्हा उभे करण्यासाठी यांना सर्वोत्तपरीने मदत करण्याची गरज असुन. शासनाने कमीत कमी बँकांच्या सीसी अकाऊंटचे व्याजदर कमी करून, जीएटीत सुट व व्यापा-यांना आर्थिक मदत करून दिलांसा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील व्यापारी करत
आहेत.
व्यापारी, ऑटोचालकासाठी कोरोना तपासणी बंधनकारक: डॉ. लहाने
नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे च्या हद्दीतील सर्व व्यापारी व ऑटोचालकासाठी कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणा-्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे पहिल्या दिवशी वारवाइत विना कोरोना तपासणी व्यापार करताना सापडले तर १ हजार रुपये दंड,तर दुबारा तो व्यापारी तपासणी मध्ये सापडला तर ५ हजार रुपये दंड जणांना आहे या वेतिरीक्त तिस-या वेळी चुक केली तर दुकानाला सिल ठोकले जाणार आहे , टॅक्सी परवानाधारक अॅटोचालकासाठी कोरोनातपानी नियम न पाळल्यास ५०० ते १ हजार दंड व परमीट रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार आहे तरी व्यापरी, अॅटोचाल, व नागरीकानि कोरोना नियमांचे पालन करुन नियमित माक्स, सानिटाझर चा वापर व सोशल डिसटन्स पाळुन सहकार्य करावे असे आवाहन बुधवारी आयोजित केलेल्या वैठकीत आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी केले आहे.
नियमांचे उल्लंघन करण-या विरुद्ध कारवाई डॉ विपिन
कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक निर्बंध घातले आहेत नियमांचे काटेकोर पने पालन करुन कोरोनाविषाणुला रोखण्यासाठी साठी सर्वांच्या मदतीची गरज आहे नियमांचे उल्लंघन करणा-्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असून दंड वसूल केला जाणार आहे नागरिकांनी प्रशासणास सहकार्य करावे अशा सूचना डॉ विपिन यांनी दिल्या आहेत.