22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeनांदेडलॉकडाऊन - अनलॉक नागरिकांच्या हातात: डॉ.विपीन

लॉकडाऊन – अनलॉक नागरिकांच्या हातात: डॉ.विपीन

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंखया आणि मृत्यूसंखया कमी होवून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शासनाने नांदेडचा पहिल्यास्तरात समावेश करुन नांदेडला अनलॉक केले आहे. परंतु नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचे कायम पालन करणे गरजेचे आहे. यामुळे धोका टळेल. अन्यथा धोका वाढल्यास नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊ न करायचे की अनलॉक करायचे हे नागरिकांच्या हातात राहिल, असा सूचक इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. यासह गेल्या सव्वा वर्षात कोरोनाच्या उपाययोजनांवर ६0 कोटी रुपयांचा खर्च झाला असून कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

कोरोना काळात प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेस पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जि.प.च्या मुखय कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन पुढे बोलतांना म्हणाले की, गेल्या सव्वा वर्षात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन पोलिस दल, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी चांगले सहकार्य केले. यामुळेच कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनावरील उपाययोजना करण्यासाठी आतापर्यंत एसपीआरएमम, जिल्हा नियोजन समिती व लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून ५0 ते ६0 कोटी रुपये खर्च करण्यात आलाा आहे. दि. ११ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक अशा १९१0 एवढ्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली होती. तर सामान्य नागरिकांसह पोलिस दलातील २५0 कर्मचा-यांना बाधा झाली होती यातील ९ कर्मचा-यांचा मृत्यू झाला. संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. यात पोलिस प्रशासनानेही तयारी केली असून डायल ११२ हा उपक्रम सुरु केला जाणार आहे.

यात ४५ चारचाकी वाहनांसह ४६ दुचाकीचा ताफा राहणार आहे. ५0 सीटी टिव्ही कॅमे-यासाठी २८ लाखाचा खर्च करण्यात आला आहे. कोरोना संकट काळात जिल्ह्यातील २७१ गावे कोरोनामुक्त होतील तर शेळगावमध्ये शंभर टक्के कोव्हीडचे लसीकरण झाले आहे. कोव्हीड लसीच्या संदर्भात बोलतांना डॉ. विपीन म्हणाले की, नांदेड जिल्ह्यासाठी दररोज २0 हजार लसींची गरज आहे मात्र सध्या केवळ ५ हजार लसींचा पुरवठा होत आहे. लसीबाबत कोणताही गैरसमज नागरिकांनी ठेवू नये. यासोबत लहान मुलांना फ्ल्यूची लस देणे आवश्यक आहे. येत्या काळात ही परिस्थिती सुधारेल. आतापर्यंत नागरिकांनी सहकार्य केल्यामुळेच नांदेड जिल्हा अनलॉक झाला आहे. परंतु कोरोना संपला नाही यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचा वापर करणे बंधनकारक आहे असे डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले.

१० जून रोजी दुर्मिळ सूर्यग्रहण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या