25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडलॉकडाऊ न शिथिल; बाजारात नागरिकांची तोबा गर्दी

लॉकडाऊ न शिथिल; बाजारात नागरिकांची तोबा गर्दी

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी १२ जुलै ते २३ जुलैपर्यंत लॉकडाउन लागु केले होते.दि.२४ शुक्रवार रोजी लॉकडाउन स्थिल करताच परत दोन दिवस बंद असल्याने या भीती ने कुंडलवाडी शहरातील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी दिसायला मिळाली.अक्षरश: एकमेकांना बाजारपेठेतून बाहेर पडण्यासाठी तारेवरची कसरत करावे लागत असे.त्यामुळे शोषल डिस्टन्सचा पूणर्ता फज्जा उडाला होता.

शनिवार रविवार दोन दिवस लॉकडाउन असल्याने शहर परिसरातील नागरिकांनी नागपंचिमची खरेदी करण्यासाठी बाजारात तुफान गर्दी केली होती.मागील काळात लॉकडाउन लागु केल्यामुळे घरातील किराणा, सामान संपले असल्याने तसेच नागपंचमी निमित्ताने कापड व किराणा खरेदीसाठी गर्दी दिसायला मिळत होती. परत जर लॉकडाऊन लागला तर कोणाला काहीही मिळणार नाही , आपण राहून जाऊ की काय असा बेत करीत महिला पुरूषांनी बाजारात एकच गर्दी केली होती.

भाजीपाला,किराणा खरेदीसाठी अक्षरश : झुंबड उडाली होती.बाजारपेठेत येणाºयांना व बाहेर जाणा-यांना निघणेही मुश्किल झाले होते.एवढी झुंबड सायंकाळ पयंर्त होती. भाजीपाला,अत्यावश्यक वस्तू आदी साहित्य खरेदी करण्यासाठी शहरात डॉ.हेडगेवार चौक,मुख्यबाजार भागात ग्राहकांची गर्दीच गर्दी झालेली होती.त्यामुळे कसले शोषल डिस्टन्स व कसले काय,अनेकांचा तोंडाला मास्क नव्हते , सारा फज्जा उडाला होता.

दरम्यान गर्दी कमी करण्यासाठी सायंकाळी 5 नंतर न.प. मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे व त्यांचे कर्मचारी सायंकाळी 5 नंतर ही जिल्हाधिकारी यांचे आदेशाला केराची टोपली दाखवत कापड,किराणा.दुग्ध आदी व्यवसाय चालू असल्याने सबंधीतावर दंडात्मक कारवाई करत रस्त्यावर उत्तरले व काहीना प्रसाद दिल्याने अवघ्या काही मिनिटांतच बाजारातील गर्दी कमी झाली व दुकाने बंद झाली.तरी नागरीकांचा मुक्त संचार सुरू झाला त्या नंतर सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी व त्यांचे पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून नागरीकांना घरात राहण्यास भाग पाडले.

शनिवार, रविवार पूर्णत: लॉकडाऊन
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाय म्हणून शहरातील नागरीक व व्यापारी १० जुलै ते १५ जुलै पाच दिवस कोरोना चैनब्रेक लॉकडाउन पाळून शहरातील कोरोना पॉझिटीव रूग्णाचा मालीकेला ब्रेक लावले तर जिल्हाधिकारी नांदेड याच्या वतीने १२ जुलै ते २३ जुलै मध्यरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आले होते.

शुक्रवार २४ जुलै पासून काही अटी व शर्तीस आधीन राहून सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार दुकाने व इतर खाजगी आस्थापणे चालू ठेवण्यास मुभा देण्यात आले.तर शनिवार,रविवार पुर्णत: लॉकडाउन पाळण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांनी दिली.

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत दुकाने व इतर खाजगी आस्थापणे चालू ठेवण्यास मुभा देण्यात आले आहे.तर सायंकाळी 5 नंतर सेतू सुविधा केंद्र,मेडिकल, दवाखाने वगळता सर्व प्रतिष्ठाणे बंद राहतील व दर शनिवार,रविवार पुर्णत:लॉकडाउन पाळण्यात येतील तर दर दिवशी सायंकाळी ५ ते दुस-यादीवशी ७ पर्यंत पुर्णता संचारबंदी कायदा लागू राहील तरी शहरातील व्यापारी व नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत शनिवार रविवार रोजी कडक लॉकडाउन पाळावे व संचारबंदी नियमाचे पालन करावे.तसेच नागरीकानी घरीच रहावे.सुरक्षीत रहावे,अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर पडुनका,सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा.शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांनी केले.

Read More  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या