22.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home नांदेड लोह्यातील शिवरायांचे स्मारक मराठवाड्यात आकर्षक ठरावे

लोह्यातील शिवरायांचे स्मारक मराठवाड्यात आकर्षक ठरावे

एकमत ऑनलाईन

लोहा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा त्यावर शिवकालीन शिल्प व स्मारक मराठवाड्यात आकर्षक व्हावा अशी वास्तू उभी राहावी असा सूचना वास्तू विशारद व संबधीत ठेकेदार यांना देण्यात आल्या व त्यासाठी निधीची कमरतात पडणार नाही असे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

लोह्यातील शिवस्मारक उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे दिवाळी पाडवा निमित्त लोह्यात व्यापा-्यांशी भेटीगाठी घेतल्या नंतर जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नियोजित छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारक स्थळी भेट दिली यावेळी लोहा मतदारसंघाचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर , भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , ह्लबळीराजाह्व चे चेअरमन माजी सभापती खुशाल पाटील बुद्रुक, उपसभापती नरेंद्र गायकवाड, गटनेता करिम शेख, नगरसेवक दता वाले, दूरसंचार सल्लागार समिती सदस्य साहेबराव काळे गुरुजी , नगरसेवक भास्कर पाटील पवार, नबी शेख, ओबीसी भाजपा अध्यक्ष अर्जुन राठोड, यासह मोठ्यासंख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते

नगर अभियंता अशोक पाटील, वास्तू विशारद ईबितवार, बांधकाम गुतेदार भोसले यांच्याशी खा चिखलीकर यांनी चर्चा केली .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा पंचधातूंच्या असून एका वर्षाच्या आत त्याचे काम पूर्ण होणार आहे . शिवकालीन शिल्प तसेच स्मारक कसे असावे यांची संकल्पना मांडली .अभियंता, वास्तू विशारद यांचं कडून माहिती जाणून घेतली कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे खा प्रतापराव पाटील यांनी स्पस्ट केले आणि मराठवाड्यात शिव शिवस्मारक भव्य व आकर्षक असावे असा संकल्प व्यक्त केला .

जलदगतीने काम सुरू आहे
प्रशासकीय पातळीवरील रीतसर पुतळा परवानगी मिळाल्या आहेत या महिन्याच्या आरंभी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निमिर्ती साठी करार करण्यात आला आहे .आज स्मारक कामावर सविस्तर चर्चा झाली. नगर पालिका निवडणूक व तत्पूर्वी शिवप्रेमींना खा प्रतापराव पाटील यांनी भव्य अश्वारूढ शिवरायांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता होते आहे याचा आनंद वाटतो असे पुतळा समितीचे प्रमुख उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी नमूद केले आहे.

पहिल्यांदाच बिहार कॅबिनेट मुस्लिम मंत्र्याविना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या