23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडकृषी व्यापा-यांकडून शेतक-यांची लूट

कृषी व्यापा-यांकडून शेतक-यांची लूट

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने अनेक शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी सह आदी पिकांच्या बियाण्यांची खरेदी करण्यासाठी सावकाराकडून उसनवारी करून बाजारातील कृषी सेवा केंद्रामध्ये बी-बियाणे खरेदी करण्यासाठी येत आहेत. पण अनेक ठिकाणच्या कृषी सेवा केंद्र चालक- मालकाकडून शहरात बियाण्याची कृत्रिम टंचाई आहे असे दाखवून त्यांच्याकडून सोयाबीन जी.एस ९३०५, करिष्मा सर्टिफाइड डबल लेबल बियाण्याचा तुटवडा आहे व युरिया, डी.ए.पी. ह्या खताचा सुद्धा तुटवडा असल्याचे सांगून शेतक-यांना बेभाव दराने बियाण्याची विक्री करून त्यांची आर्थिक लूट करत आहेत, या बाबीकडे स्थानिक कृषी अधिकारी विजय चना व पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा युवासेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांनी केला आहे.

हिमायतनगर शहरातील कृषी अधिकारी या पदावर कार्यरत असलेले अधिकारी हे कार्यालयात नेहमी गैरहजर असतात, त्यामुळे ग्रामीण भागातुन येणा-या शेतक-यांनी कुणाकडे दाद मागायची शहरातील कृषी व्यापा-याकडून एका सोयाबीनच्या बॅगला चार ते साडेचार हजार रुपया पर्यंत विक्री होत आह.े ह्या संदर्भात पंचायत समिती मधील कृषी विभागाकडे शहरात सोयाबीन चा किती पुरवठा शिलक आहे ह्याची चौकशी करण्यासाठी गेले असता तेथील अधिकारी सुद्धा गैरहजर असल्याचे आढळून आले.

त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतक-यांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबीला हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी हे जबाबदार आहेत. त्यामुळे या शेतकरी वगार्ला आता खरी साथ देण्याची गरज राजकीय पक्षाची आणि जिल्हा परिषद कृषी विभाग नांदेड यांची आहे. परंतु एकही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेतेमंडळी कृषी विभागाला जाब का विचारत नाहीत? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

त्यामुळे अनेक शेतक-यांचे प्रश्न घेऊन हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांनी हिमायतनगर येथील कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन भेट दिली असता तेथील अधिकारी हे नेहमी गैरहजर राहतात असे सांगण्यात आले. त्यांनी ही बाब हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना सांगितले असता, ह्याची तात्काळ दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड जिल्हा कृषी अधिकारी यांना हिमायतनगर येथील कृषि कार्यालयास भेट देऊन चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिका-यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावे व शेतक-यांचे होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवण्यात यावी, सोयाबीन व खताचा तालुक्यासाठी जास्तीत जास्त साठा पाठवण्यात यावा अशा सूचना फोनद्वारे दिल्या, त्यामुळे परिसरातील शेतक-यांनी तात्पुरते समाधान व्यक्त केले आहे.

पाक संसदेत गदारोळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या