21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeनांदेडछावाच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध

छावाच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध

एकमत ऑनलाईन

लोहा : गेली अनेक वषार्पासून शांततेच्या मागार्ने चालू असलेला मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असताना नुकतेच सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून लोहा तालुक्यातिल सायळ येथे तीव्र निषेध करून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

सरकारच्या विरोधात सकल मराठा समाज लोह्याचा वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला आहे. सायळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार आर्पण करुन सकल मराठा समाजाच्या वतिने सरकारचा निषेध करत सदरील आरक्षणासाठी दिलेली स्थगिती त्वरित उठून संबंध मराठा समाजाला न्याय देण्यात यावा अथवा मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल याची नोंद घेण्याचे आव्हान ही शासनाला करण्यात आले आहे. यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष माऊली पवार, गोविंद पवार.दिपक शेवाळे,तुकाराम ढगे,भारत ढगे, गणेश भारती आदी उपस्थित होते.

हणेगाव येथे मराठा आरक्षण संदर्भात निवेदन
हणेगाव येथे दिनांक ११-रोजी सकल मराठा बांधवांच्या वतीने प्रशासनास निवेदनाद्वारे कळविण्यात आले की, सुप्रीम कोटार्ने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे कारण शासनाने योग्य तो पाठपुरावा न केल्याने मराठा आरक्षण चालू वषार्साठी स्थगिती देण्यात आली तरी शासनाने तात्काळ ही स्थगिती उठवावे अन्यथा मराठा समाजावर व मराठा समाजाच्या होतकरू विद्यार्थ्यांवर शिक्षण व नौकरीवर खुप मोठा अन्याय होत आहे तरी मराठा समाजाला आरक्षण देऊन
ओ.बि.सी. प्रवर्गात समावेश करावे व स्थगीती तात्काळ उठवावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या