24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeनांदेडवाळू मफियांविरूध्द महसूल विभागाची मोठी कारवाई

वाळू मफियांविरूध्द महसूल विभागाची मोठी कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिलेल्या आदेशानुसार महसूल विभागाने वाळुमाफियांविरूध्द कारवाईची मोहिम तीव्र केली आहे. आज रविवारी पहाटे ५ वाजल्यापासुन नांदेड तालुक्यातील जवळपास सहा ते सात घाटांवर ६० ते ७० तराफे जाळून नष्ट केले. सोबतच उपसा करण्यात आलेला अवैध रेतीसाठा जप्त केला आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत कारवाई सुरूच होती. अशी माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली.

नांदेड तालुक्यातील वाळू घाटांवर आत्तापर्यंत मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून ७० वाहने जप्त करून अवैध रेतीसाठ्याचा लिलाव करण्यात आला. त्यापोटी जवळपास १ कोटी ८१ लाख रूपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. नांदेड तालुक्यातील नागापूर, वांगी, पुणेगाव, त्रिकुट या घाटांवर आज रविवारी पहाटे ५ वाजल्यापासुन महसूल विभागाचया पथकाने कारवाई सुरू केली. दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ६० ते ७० तराफे जाळून अवैध रेतीसाठी जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या आदेशानुसार तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मुगाजी काकडे, अनिरूध्द जोंधळे, कांबळे व तालुक्यातील सर्व तलाठी, कर्मचारी कारवाईत सहभागी झाले आहेत.

यापुढे आणखी कारवाईची मोहिम वाढविण्यात येणार असून वाळू माफियांनी परवानगीशिवाय वाळूचा उपसा करू नये, अन्यथा त्यांच्याविरूध्द दंडात्मक कार्यवाही करून वाहने जप्त करण्यात येणार आहेत. तालुक्यातील सर्वच वाळूघाट परिसरात चोविसतास पाण्याच्या बोटमधून सिसीटीव्ही कॅमे-याची करडी नजर ठेवण्यात आली आहे. वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी तात्काळ जात असून त्यांच्याविरूध्द दंडात्मक कार्यवाही होत आहे. आता वाळूमाफियांची गय केली जाणार नसून अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. असे तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगीतले.

तालुक्यातील आत्तापर्यंत जवळपास १ हजार ब्रास वाळु जप्त करण्यात आली असून यापुढेही जप्तीची मोहिम सुरूच राहणार आहे. चोविस तास महसूल विभागाचे कर्मचारी वाळू घाटावर तैणात करण्यात आले आहेत. महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून चोरटी वाळू विक्री थांबविण्यासाठी कारवाईमुळे मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मी अजून ही बारामतीचा नाद सोडलेला नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या