कुंडलवाडी : प्रतिनिधी
संत गजानन महाराज भक्त मंडळ व कुंडलवाडी येथील शतरंजी गल्लीत संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी हणमंत आप्पा मठवाले यांच्या हस्ते संत गजानन महाराजांच्या मूर्तीला पहाटे सूर्योदयापूर्वी अभिषेक करण्यात आला.यानंतर संततगजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सप्ताहात संत गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले. कार्यक्रमात श्रावण महाराज, बामणीकर यांचे कीर्तन रमेश लक्ष्णराव शिंदे नागोराव,लक्ष्मण कवडेकर, शिवाजी मल्लू,भंडारे मारोती.सायबू भंडारे,मारोती शंकर होरके यांचे कीर्तन झाले. महाआरतीनंतर संत गजानन महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरातील श्री संत गजानन मंदिर, व्यंकटेश मंदिर, बाजार मैदान, हनुमान मंदिर,कुडलेश्वर मंदिर मार्गे परत गजानन मंदिरात मिरवणूक पोहोचला.संत महाराज भजन मंडळ, कलाकार, तुळशी वृंदावन वाहून नेणाऱ्या महिलासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक शोभा यात्रा गजानन मंदिरात पोहोचल्यावर महाप्रसाद वाटप करण्यात आला, या शोभा यात्रेत प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, यावेळी निराली समाजाचे प्रमुख प्रशासक राजेश सिद्राम इंदूरकर यांनी श्री श्रावण महाराज ब्राह्मणीकर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष मेहेरकर, सुरेश लिंगुराम ढगे, यादव एमेकर गजानन झपलकर शंकर झंपलकर, देविदास रणविरकर, नरेश भांगे शामराव मांगे, दिनेश येमेकर, गंगाधर एमेमकर, गजानन ढगे, मानू नारायण एमेकर, पंढरीनाथ झंपलकर, बालाजी एमेकर राम एमेकर यांनी सहकार्य केले.
यावेळी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महाप्रसादानंतर श्री गजानन मंदिरात भजन भारुड धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.