24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्सवात साजरा

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्सवात साजरा

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. मुक्ती संग्राम दिना निमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंचायत समिती नांदेडच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस महाराष्ट्र राज्यातील एक मराठवाडा प्रदेश आहे. आजच्या दिवशी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा प्रांत रजाकाराच्या तावडीतून मुक्त झाला आहे. १९४८ मध्ये या दिवशी मराठवाड्यात निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली. या साठी ज्ञात आणि अज्ञात शूरवीरांनी जीवाची बाजी लावून हा प्रदेश मुक्त केला म्हणून स्वतंत्र सैनिक स्वामी रामानंद तिर्थ त्यांच्या प्रति कृतिज्ञता व्यक्त करण्यासाठी पंचायत समिती नांदेड च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ ते मराठीचे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आहेत. प्रबोधनकाराचे प्रमुख आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून महात्मा फुले यांना मानत, महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी सा-यांची दाणादाण उडवून दिली.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुज-्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.म्हणून आज या स्मृतीदिनी पंचायत समिती च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास उपस्थित पंचायत समितीच्या सभापती श्रीमती कावेरी वाघमारे, उपसभापती राजू हाटकर,सदस्य प्रभू पाटील इंगळे,सदस्य प्रतिनिधी बालाजी सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघमारे,गट विकास अधिकारी श्रीमती अनिता सरोदे, गट शिक्षण अधिकारी श्री.रुस्तुम आडे,कृषी अधिकारी श्रीमती देशमुख मॅडम,कनिष्ठ प्रशासन अधिकारीबोर्डे सर,विस्तार अधिकारी (पं)श्री.गोविंद मांजरमकर, जिवन कांबळे, विस्तार अधिकारी(सां.) डी. के.आडेराघो,कृषी विस्तार अधिकारी सतीश लकडे, धनराज शिंदे,आरोग्य विस्तार अधिकारी गीते, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.मेकाले सर, परमेश्वर गोणारे, श्रीमती भारती मॅडम,वरिष्ठ सहायक श्रीमती स्वामी मॅडम, मनरेगा तांत्रिक अधिकारी जितेंद्र लांडगे,उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक इरवंत सुर्यकार, पाणी पुरवठा श्री.विजय पारडे, कनिष्ठ सहायक कामाजी सूर्यवंशी, परिचर उस्मान शेख,आदींची उपस्थिती होती.

एसटी डेपो नांदेड आगारात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा; ३७ चालकांना बक्षीस वाटप
नांदेड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे दि. १७ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी ७३ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व विना अपघात सुरक्षित सेवा पूर्ण करणार्‍या ३७ एसटी चालकांना सुरक्षित सेवेचे बॅच- बिल्ले देऊन सन्मानीत करण्यात आले.
सर्वप्रथम सकाळी ठिक ७.०० वाजता आगार व्यवस्थापक मा. श्री. पुरुषोत्तम ता. व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास बसस्थानक प्रमुख सौ. वर्षा येरेकर, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा एसटी मेकॅनिक, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड, आगार रोखपाल श्री. शंकर बेलूरकर, वाहतूक नियंत्रक श्री. बालाजी शिंदे, श्री. राजेश गहिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहणानंतर आगार व्यवस्थापक श्री. पुरुषोत्तम व्यवहारे यांच्या हस्ते ३७ चालकांना सुरक्षित सेवेचे बॅच- बिल्ले देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये ५ वर्षे, १० वर्षे, १५ वर्षे, २० वर्षे, २५ वर्षे अशी विना अपघात सेवा बजावणारे ३७ चालकांचा समावेश होता. शेवटी आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी कर्मचार्‍यांना उत्पन्न वाढ, इंधन बचत, विना अपघात सेवा इत्यादी बाबी विषयी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करुन ७३ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचान मा. श्री. शंकर बेलूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी मानले. यावेळी कर्मचारी गुरुजीतसिंघ सदर, संजय बुक्तरे, राजेश गहिरवार, राजेंद्रकुमार निळेकर, आतिष तोटावार, सौ. शिल्पा ढवळे, सौ. शिवकांता कदम, मारोती तुप्पेकर, दिलीप पिल्ले, नितीन मांजरमकर, मनोहर माळगे, एस.टी. बुरकुले, विकास राव, आनंदराव कंधारे, राजेंद्र बनसोडे हे कर्मचारी बांधव उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास युवा पिढीने आत्मसात करणे काळाची गरज: मिसलवाड
नांदेड: भारत देश स्वातंत्र्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व समाजामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याला आहे. स्वातंत्र्यानंतर ५६५ संस्थांनांपैकी हैद्राबाद संस्थानचा निजाम मराठवाडा भूभाग सोडण्यास तयार नव्हता तेंव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनेकांनी बंड पुकारले यात अनेक सेनानी हुतात्मे झाले, हा इतिहास युवा पिढीनी आत्मसात करुन समाजाप्रति एक आदर्श निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा एसटी मेकॅनिक सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.ते दि. १७ सप्टेंबर २०२१ शुक्रवार रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललीत कला भवन विभागीय कार्यालय नांदेड येथे ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात येऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले व राष्ट्रगीत म्हणण्यात आले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावचे आप्पासाहेब भगवंतराव नाईक यांच्या नेतृत्वात मोठा संग्राम झाला. त्यात ३५ सेनानी हुतात्मा झाले हा इतिहास सर्व जनतेला माहिती होऊन युवावर्गासमोर आला पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रदीप शिवानंद राहेगावकर, रमेश सोने हे उपस्थित होते. यावेळी केंद्र संचालक विलास मेंडके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सुत्रसंचलन केंद्र महिला साह्हिका सौ. मनिषा काळे यांनी केले तर सौ. मिनाक्षी राहेगावकर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी श्री नामदेव तायडे, गोविंद मुखेडकर, विकास राव, मलीकार्जुन आंबेगावकर, अरुणा गिरी, अनिता केळकर, उषा गवई, अनिता पांचाळ, रत्नमाला तेलंग हे उपस्थित होते.

हानेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा-
हाणेगाव: हाणेगाव येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हणेगाव ग्रामपंचायत चे सरपंच सौ वैशाली विवेक पडकंटवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंचतसेच ग्राम विकास अधिकारी बी जी उमाटे, विवेक पडकंटवार माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हानेगाव, दिलीप बंदखडके जिल्हा परिषद सदस्य हाणेगाव, प्राचार्य शंकरराव राठोड, वसंत आडेकर ग्रामपंचायत सदस्य, नागेंद्र गिरेवाड ग्रामपंचायत सदस्य, उमाकांत पंचगले ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी माधव नामेवार, रामदास बैलवाड, सचिन भंडारे, अहमद अतार आदी.

हानेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा
हाणेगाव: हाणेगाव येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हणेगाव ग्रामपंचायत चे सरपंच सौ वैशाली विवेक पडकंटवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंचतसेच ग्राम विकास अधिकारी बी जी उमाटे, विवेक पडकंटवार माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हानेगाव, दिलीप बंदखडके जिल्हा परिषद सदस्य हाणेगाव, प्राचार्य शंकरराव राठोड, वसंत आडेकर ग्रामपंचायत सदस्य, नागेंद्र गिरेवाड ग्रामपंचायत सदस्य, उमाकांत पंचगले ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी माधव नामेवार, रामदास बैलवाड, सचिन भंडारे, अहमद अतार कोडलवाड के , एम, तलाठी हाणेगाव,चेलवे सावकार, संतोष राठोड ग्रामपंचायत सदस्य,आदिजन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या