32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeनांदेडमांडवी परिसरात मटका जुगार जोमात; पोलिसांचे दुर्लक्ष

मांडवी परिसरात मटका जुगार जोमात; पोलिसांचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

मांडवी : मांडवी व परिसरात मटका नांवाचा जुगार ठीक ठिकाणी जोरात सुरू असून नव्याने रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक शिवरकर यांच्या समोर मटका चालकाचे मोठे आव्हान उभे असून मटका सह इतर अवैध धंदे बंद होतील का? हे येणाऱ्या काळातच कळेल. काहि वर्षांपूर्वी मांडवी परिसरात मटका नावाच जुगाराचे गंधासुद्धा नव्हते विदभार्तील चिखलवर्धा या ठिकाणी मटका चालत असे पण हळू-हळू करत मांडावीत मटकाला सुरुवात झालली आणि थोडं-थोडं करत पूर्ण मांडवी परिसरात मटकाचे जाळे पसरले मांडवी,पिंपळगाव,उमरी,कोठारी,जम्ांून नगर या ठिकाणी जोरात टाईम बाजार ,मिलन,कल्याण नावाचे मटका ओपन क्लोज सुरू झाले. एकीकडे कोरोना विषाणूने मागील वर्षी लॉकडाऊन लागल्यामुळे जनतेचे कम्बरडे मोडले आहे.

कामाच्या शोधात असलेले मजुरांच्या हाताला काम नाही कोरोना मुळे रोजगार हिरावला असून या दुष्काळात संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे या परिसराती मटका चालकांना कुणाचेही धाक राहिला नसून बिनदिक्कतपणे हा मटकाचा धंदा जोरात चालू असून मटकामुळे कित्येकांचे घर उध्वस्त झाले आहे या भागात अवैध धंदे करणारे अक्षरासा हौ दासा घातला असताना स्थानिक गुन्हे शाखाचे नजर का पडली नसावी स्थागुशा फक्त नांदेड पुरतेच मर्यादित आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे तात्कालीन सपोनि केंद्रे हे सिंघम स्टाईलने या भागातील मटकासह इतर अवैध धंद्यावर अंकुश ठेवले होते पण त्यांची बदली होताच पुन्हा मटकासह इतर अवैध धंदेकरणारे डोकेवर काढले असल्याचे दिसून येत आहे नव्याने रुजू झाले सपोनी शिवरकर यांनी आता दबंगगिरी,दाखविण्याचे गरज असून आपल्या दबंगाईने मटकासह अवैध धंदे नेस्तनाबूत करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वाळू वाहतूक करणारे १३ ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या