Thursday, September 28, 2023

किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

नांदेड : मराठवाड्यातील नांदेड व परभणी जिल्ह्यात जून महिन्याच्या लागवड केलेल्या बीटी कपाशीमध्ये पाते फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापणासाठी सामूहिकपणे एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करुन किडींचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुभार्वाचे निरीक्षण करण्यासाठी कपाशीच्या लागवडीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी पाच साम कामगंध सापळे व गुलाबी बोंडअळीचे पतंग नष्ट करण्यासाठी कपाशीच्या शेतात हेक्टरी ४० सापळे लावावे.

पाच टक्के निंबोळी अकार्ची प्रतिबंधात्मक फवारणी किंवा आझाडीर्रेक्टींन १ हजार५०० पीपीएम ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. बीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीच्या अंडी अवस्थेत व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किडीची १.५ लाख अंडी प्रति हेक्टर ५० व ७० दिवसानंतर दोन वेळा वापर करण्यात यावा. आर्थिक नुकसानीची पातळी : आठ पतंग प्रति सापळे सतत तीन दिवस किंवा एकरी दहा फुले किंवा एकरी दहा बोंडे याप्रमाणे आढळून आल्यास रासायनिक कीटकांनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब ७५ टक्के पाण्यात विद्राव्य असणारी भुकटी २० ग्राम किंवा क्विंनालफोस २५ ईसी २० मिली प्रती १० लीटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. चक्रीभुंगा या किडीचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनांमध्ये ३० ते ४० पर्यंत घट संभवते. ही कीड खोडावर दोन समांतर खापा करुन अंडी घालते. यामधून अळ्या बाहेर निघाल्यानंतर खोडातील गर खातात. त्यामुळे त्यावरील भाग सुकतो. आर्थिक नुकसानीची पातळी : एक मीटर ओळीमध्ये तीन ते पाच प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास उपाययोजना करावी़

Read More  भोकर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या