34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeनांदेडबैठका, सभा नंतर आता प्रसिद्धी माध्यमांवर उमेदवारांचा जोर

बैठका, सभा नंतर आता प्रसिद्धी माध्यमांवर उमेदवारांचा जोर

एकमत ऑनलाईन

नांदेड (चारुदत्त चौधरी) : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात उमेदवारांच्या बैठका, सभा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता केवळ मतदान कसे करुन घ्यायचे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पसंती १ ला द्यायची की २ ला या संदर्भात रणनिती आखण्यात येत आहे. ३ लाख ७३ हजार ४८५ मतदारांपर्यंत पोहंचणे अशक्य असल्यामुळे आता प्रसिद्धी माध्यमांवर पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांनी जोर दिला आहे. यामध्ये सर्वप्रथम बाजी राष्ट्रवादीने मारली असून आठही जिल्ह्यात सतीश चव्हाण यांचे डिजीटल बॅनर झळकू लागले आहेत. नांदेड जिल्ह्यात अद्यापही भाजपने प्रसिद्धी माध्यमांकडे लक्ष दिले नसल्याचे ठळक दिसून येत असल्यामुळे चर्चेला उधान आले आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुरंगी लढत असल्याचे सांगत असले तरी खरी लढत पुन्हा एकदा महाआघाडीचे सतीश चव्हाण तर भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात दिसून येत आहे. या मतदारसंघात महिला मतदाराचे प्रमाण खूपच कमी आहे. २ लाख ८६ हजार ५४३ पुरुष मतदार आणि केवळ ८६ हजार ९३७ महिला मतदार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ६ हजार ५00, जालना २७ हजार ९९0, परभणी ३२ हजार ७३५, हिंगोली १६ हजार ७७४, नांदेड ४९ हजार ३६५, लातूर ४१ हजार २४९, उस्मानाबाद ३३ हजार ६३६, बीड ६३ हजार ४२६ असे एकूण ३ लाख ७३ हजार ४८५ मतदार आहेत. यापैकी कितीजण १ डिसेंबरला मतदानाचा हक्क बजावतील याकडे लक्ष असले तरी उमेदवारांनी मात्र मतदान करुन घेण्यासाठी नियोजन करत आहेत. भाजपचे शिरीष बोराळकर यापुर्वी देखील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सहभाग घेतला होता. त्यावेळी देखील त्यांनी प्रसिद्धी माध्यमापासून दोन हात दूर राहिल्यामुळे त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. पुन्हा एकदा तीच चूक त्यांच्याकडून होत असल्याचे भाजप कार्यकर्ते उघडपणे सांगत आहेत. यावेळी सतीश चव्हाण यांना मात्र कॉंग्रेससह शिवसेनेची साथ असल्यामुळे आजघडीला तर सतीश चव्हाण यांचे पारडे जड दिसत आहे.

आ. चव्हाणांसाठी तिन्ही पक्षाचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. मराठवाड्यातील बहुतांश शैक्षणिक संस्थावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा प्रभाव आहेत्यामुळे संस्थात्मक प्रचारावर राष्ट्रवादीकडून भर दिला जात आहे. शिक्षक, प्राध्यपक मंडळी प्रचाराच्या पातळीवर कामावर लागली आहेत. भाजपचे नेते मंडळी प्रचार आणि प्रसार करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात खा. चिखलीकरांनी आपल्या खांद्यावर बोराळकरांचे ओझे घेतले आहे. ४९ हजार ३६५ पैकी खा. चिखलीकर बोराळकरांच्या पारड्यात किती मतदान खेचून आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत दोन्ही उमेदवारांनी आता सभा, बैठकांवर लक्ष केंद्रीत न करता प्रसिद्धी माध्यमासह प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीकडे लक्ष वेधले आहे.

ऊसदराची कोंडी कोण फोडणार? स्व. सुधाकरपंत परिचारक यांची उणीव भासू लागली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या