कंधार : कंधार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत व व्यापारी वर्गाच्या कामात होणारा विलंब व त्रास दूर करून व्यापारी वर्गाला होणारा मनस्ताप दूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कंधार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचा मनमानी कारभार सुरु असून येथील अधिकारी,कर्मचा-याच्या मनमानीला जनता कंटाळली आहे. बँकेत कर्मचारी ग्राहकांना वेठीस धरत आहे. बँकेचे कामकाज कासव गतीने व त्यांच्या मनाप्रमाणे चालते. दररोज या बँकेत विड्रॉल असो अथवा पैसे भरायचे असो रांगेत तासनतास ग्राहकांना उभे राहावे लागते. तसेच शहरातील किरकोळ व ठोक व्यापा-यांनी बँक ऑफ इंडिया शाखेचा कंधार चा खूप त्रास सहन करावा लागत असून व्यापारी वर्गाची सी.सी रिनिव्ह करण्यासाठी ६ ते १२ महीने कालावधी लागतो, तसेच स्टेटमेंट वेळेवर मिळत नाही त्याचा परिणाम आर्थिक भार व वेळ दोन्ही गोष्टी वाया जातात, तसेच शाखेच्या कर्मचा-यांची वागणूक चांगली नाही कामासाठी टोलवाटोलवी व हेकेकोर वृत्ती मुळे व्यापारी वर्गाचे आतोनात नुकसान होत आहे.
त्यासाठी रिजनल मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया, रिजनल विभाग लातूर यांना ग्राहकांना होणारा त्रास दूर करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी शिवा मामडे, स्वप्निल फरकंडे, व्यंकट पाटील जाधव, प्रा. अनिल वट्टमवार शौकत सेठ, संजय बिडवई, ईशान मुत्तेपवार, विकी बिडवई यांची उपस्थिती होती. याच्या प्रतिलीपी विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, अशोकराव चव्हाण पालकमंत्री नांदेड जिल्हा खा. प्रतापराव चिखलीकर नांदेड जिल्हा, खा. सुधाकर शृंगारे लातूर जिल्हा, आ. श्यामसुंदर शिंदे, व्यंकटेश मुंडे तहसीलदार, व्यापारी संघ महाराष्ट्र, व्यापारी संघ नांदेड यांना देण्यात आले आहे.