नांदेड : शहरात शुक्रवारी मध्यरात्री व दुपारी भुकं पाचे सौम्य धक्के बसले असुन, याची विद्यापीठाच्या भुमापक यंत्रात ०.६ रे. स्केल एवढी नोंद झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.२८ वाजता भुकंपाचा धक्का नांदेड शहरातील लेबर कॉलनी, श्रीनगर या भागांनी अनुभवला. यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भुकंप मापक यंत्रणेशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की, एक हेक्टर स्केलपेक्षा कमी असलेल्या भुकंपाचा धक्का नोंदणी प्रक्रियेत सुध्दा योग्यरितीने नोंद होत नाही.
रात्री १२.२८ ला झालेला भुकंपाचा धक्का हा ०.६ ऐवढा रे. स्केलवर नोंदवला गेला. त्यामुळे २२ ऑक्टोबर रोजी दुपारी झालेला भुकंपाचा धक्का सुध्दा तशाच कांही अवस्थेतला असेल ज्याची नोंद भुकंप मापक यंत्रावर झाली नव्हती. पण आवाज आला अशी चर्चा आयटीआय, लेबर कॉलनी, औद्योगिक वसाहत आदी भागांमधून ऐकायला मिळत होती.दरम्यान या संदर्भात निवासी जिल्हाधीकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगीतले की, शहरात झालेल्या सौम्य धक्क्याची नोंद विद्यापीठाच्या भूमापन यंत्रात झाली असुन, नागरीकांनी घाबरून जावु नये असे आवाहन करण्यात आले आहे.