लोहा : ग्रामीण भागातील जनतेला दररोजच्या घडामोडी विविध योजनेची माहिती गाव पातळीवर व्हावी म्हणून शासनाने गाव तिथे सार्वजनिक वाचनालय निर्माण करण्याचा निर्णय घेऊन वाचनालयाला दरवर्षी अनुदान देण्याची योजना सुरू केली. या योजनेत लोहा तालुक्यात ७३ अनुदानित वाचनालय आहेत त्यापैकी ११ वाचनालय अकार्यक्षम असून ६२ वाचनालय चालू आहेत. असे असतांना ही तालुक्यातील दहा ते बारा वाचनालय सोडले तर एकाही वाचनालयात दैनंदिन वर्तमानपत्र उपलब्ध नाहीत विविध पुस्तके नाहीत ग्रामीण भागातील जनतेला पेपर अथवा पुस्तके कादंबरी वाचण्यास मिळत नाहीत केवळ कागदावर वाचनालय दाखवून अधिका-्यांना हाताशी धरून वषार्चे एडिट हे प्रत्यक्ष गावात जाऊन न करता चक्क अधिकारी हॉटेलवर वर बसून वार्षिक आडीट करून आर्थिक मलिदा घेऊन पसार होतात आणि वाचनालय चालक शासनाकडून आलेले अनुदान पेपरविना हडप करतात. यामुळे तालुक्यातील वाचनालये हे कागदावर असून या सर्व वाचनालयाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामीण भागातील वाचकामधून केली जात आहे.
ग्रामीण भागातील जनतेला गावातच दैनिक साप्ताहिक पुस्तके वाचण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागात वाचनालय स्थान करण्याची योजना सुरू केली ब, क ,ड असा दर्जा वाचनालयाचा तयार करून दर्ज्या नुसार ब दर्जाच्या वाचनालयाश वार्षिक अनुदान १ लक्ष ९२ हजार रुपये प्राप्त होते त्यातून ५०% रक्कम ही कर्मचा-्यांच्या पगारावर खर्च करावी लागते, २५% टक्के रक्कम पुस्तके व उर्वरित रक्कम ही दैनिक पेपर, भाडे यांच्यावर खर्च केली जाते. क दजार्साठी दरवर्षी ९६ हजार रुपये तर ड दजार्साठी ३० हजार रुपये शासनाकडून अनुदान दरवर्षी देण्यात येते वाचनालयात दररोज दहा दैनिक साप्ताहिक व कादंबरी विविध पुस्तके मासिके ठेवणे आवश्यक आहे व वाचनालय दररोज ठराविक वेळेनुसार उघडे करणे बंधनकारक आहे असे असताना तालुक्यातील वाचनालय चालक हे पेपरवर आणि पुस्तके मासिके यावर खर्च न करता शासनाचे अनुदान हडप करण्याच्या हेतूने अधिका-्यांना हाताशी धरून चेरीमेरी देऊन वर्षभराचे आडीट हाटेल वर बसून करून घेतात अधिकारी गावात न जाता हाटेल मध्ये बसून वाचनालयाचे एडिट करून वाचनालय सुरळीतपणे सुरू असल्याचे आवाहल पाठवून देऊन वाचनालय चालकाचा अनुदान उचलण्याचा मार्ग मोकळा करून देतात अनेक वर्षांपासून हीच पद्धत तालुक्यात सुरू असल्याने तालुक्यातील वाचनालय हे कागदावरच असल्याचे दिसून येते गेल्या नऊ दहा महिन्यापासून तर कोरोना आजाराचे नाव पुढे करून वाचनालय कुलूपबंद आहेत या सर्व प्रकारची चौकशी करून ग्रामीण भागातील वाचनालय वाचकांसाठी खुले करावे अशी मागणी वाचकातून होत आहे.
कोकणवासियांसाठी मुंबईत जाण्यास पर्यायी मार्गाची घोषणा