23.2 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडआयकराच्या पैशातून साडेतीन लाखाचा गैरव्यवहार

आयकराच्या पैशातून साडेतीन लाखाचा गैरव्यवहार

एकमत ऑनलाईन

देगलूर (नरसिंग आन्नमवार ) : शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पेठ अमरापुर या केंद्राचे मुख्याध्यापक पाटील एस. एस. यांनी २३ शिक्षकांचे इन्कम टॅक्स चे पैसे चालनद्वारे आयकर विभागास साडे तीन लाख रुपये भरणा न करता स्वत: हडप करणा-या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी या केंद्रातील शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पेठ अमरापूर येथील मुख्याध्यापक पाटील एस. एस. यांनी या केंद्रातील २३ शिक्षकांचे इन्कम टॅक्स चे पैसे माहे जानेवारी फेब्रुवारी २०२० मध्ये १० ते ३० हजार रुपयापर्यंत इन्कम टॅक्स रक्कम कपात केली आहे परंतु मुख्याध्यापक यांनी फक्त फेब्रुवारी महिन्यातीलच इन्कम टॅक्स भरणा केली व जानेवारी २०२० मधील तीन लाख पन्नास हजार रुपये इनकम टॅक्स विभाग आयकर विभागात भरणा केली नाही या प्रकरणाचा एक वर्ष पूर्ण होत आहे आम्ही सर्व केंद्रातील २३ शिक्षकांनी याची विचारपूस केली असता अरेरावीची भाषा वापरून भरले नाही जा तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे उद्धट भाषा या शिक्षकांना वापरत आहेत तसेच या प्रकरणात एक वर्ष पूर्ण होत आहे. तसेच या अगोदर केंद्रातील शिक्षकांनी त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी केल्या पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा कार्यवाही झालेली नाही हे केंद्रीय मुख्याध्यापक यांनी या अगोदर माहे एप्रिल च्या पगारातून प्रत्येक शिक्षकांच्या खात्यातून दोन हजार ते पाच हजार रुपये कपात केली होती वरिष्ठ कार्यालयात तक्रार केल्यामुळे कपात रक्कम दुसर-या दिवशी बँकेत जमा करण्यात आली.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगलूर या शाळेचे शालेय पोषण आहार तांदूळ काळ्याबाजारात या मुख्याध्यापकाने विक्री केली होती परंतु काही वर्तमानपत्रात बातमी आली तेव्हा या बाजारातील तांदूळ शाळेत आणून जमा केले असे अनेक तक्रारी या केंद्रातील शिक्षकांचा आहे तसेच हे केंद्रीय मुख्याध्यापक यांनी दरमहा पगार यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून पैशाची मागणी केली जाते पैसे नाही दिल्यास पगार करणार नाही. असे उद्धट भाषा वापरतात पेठ अमरापूर केंद्रांतर्गत ७५ टक्के शिक्षिका असल्यामुळे त्यांना उठाव करता येत नाहीत .म्हणून हे केंद्रीय मुख्याध्यापक पाटील एस. एस. हे याचा गैरफायदा घेत आहेत. देगलूर येथील गटशिक्षणाधिकारी यांनी या मुख्याध्यापकाच्या कारभाराकडे दुर्लक्ष करून पाठीशी घालत आहेत व व तालुक्यातील शिक्षकाकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी वरिष्ठ अधिका-्यांनी या मुख्याध्यापकांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व इन्कम टॅक्स कार्यालय नांदेड, शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर जाधव सूर्यकांत, दमकोंडवार, बिरादार एन .आर., मुंगे व्ही. एन., श्रीमती ये .डी. वट्टमवार, चिंतावार एल .व्ही. ,श्रीमती काळे एस .एस., बिरादार जी. एच. कांबळे पी .झेड., आदी ४० शिक्षकांच्या स्वाक्ष-या आहेत.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वत: …

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या