32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड सबसिडीच्या नावाखाली गॅस धारकांची दिशाभूल

सबसिडीच्या नावाखाली गॅस धारकांची दिशाभूल

एकमत ऑनलाईन

देगलूर : सध्या महागाई वाढतीवर आहे. पेट्रोल, डिझेल, सोबतच गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वांना महागाईच्या झळा पोहोचत आहेत. यामुळे घडविण्याचे बजेट कोलमडले असून सर्वांना महागाईच्या झळा बसत आहेत सुरुवातीला गॅस सिलेंडर वर ग्राहकांना सिलेंडरच्या अर्ध्या किमी ती एवढी सबसिडी दिली जायची परंतु आता केवळ नाममात्र चार रुपये एवढी सबसिडी दिली जात आहे बोर देऊन आवळा काढल्याचा प्रकार ग्राहकास सोबत होता हे सरकारने सबसिडी सुरू केली तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत ५५० ते६०० च्या घरात होती तेव्हा ग्राहकांना २४० रुपये एवढी सबसिडी ग्राहकांना दिली जायची.

सध्या गॅस सिलेंडरची किंमत सातशे नव्वद रुपये झाली आहे. मात्र आता सिलिंडरवरील सबसिडी ही केवळ नाममात्र चार रुपये दिले जात आहे. विशेष म्हणजे अनेक ग्राहकांचे खाते लिंक होत नसल्यामुळे बर्‍याच ग्राहकांना सबसिडी मिळत नाही .त्यांना या सिलिंडरच्या वाढत्या किमतीचा दुहेरी फटका बसत आहे. त्यातही अनेकदा गॅस सिलेंडरची किंमत पाचशे चाळीस रुपये असल्यास अनेक एजन्सी मालक हे ग्राहकाकडून सुटे नसल्याचा बहाणा करीत सरळ साडेपाचशे रुपये घेतात .त्यामुळे दररोज ५००सिलेंडर विकणा-या एजन्सीला त्यामुळे सरळ दोन हजार रुपये दररोज मिळतात. हे वास्तव्य नाकारता येत नाही सुट्टे पैसे नसल्या मुळे अनेकदा एजन्सीधारक व ग्राहकांमध्ये वाद होताना दिसून येत आहेत.

ज्या सिलेंडर हे त्या दिवशी असलेल्या किमतीमध्ये ग्राहकांना देण्याची जबाबदारी गॅस एजन्सी असते. त्यातही ग्राहकाने स्वत: सिलेंडर नेल्यावर ठरलेल्या किमतीचा वीस रुपये कमी घेणे क्रमप्राप्त आहे. परंतु अशी कुठेही होत नाही ग्राहकाने स्वत: सिलेंडर नेली तरी सुद्धा त्याला पूर्ण किंमत मोजावी लागते याबाबत बहुतेक ग्राहकांना माहिती नसल्यामुळे एजन्सी धारकांचे फावते आहे.

सक्रिय रूग्णसंख्येत भारत जगात १५ व्या क्रमांकावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या