31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडश्रीया तोरणे हिस राष्ट्रीय स्पर्धेत मिस अर्थ इंडिया इको टुरिझम किताब

श्रीया तोरणे हिस राष्ट्रीय स्पर्धेत मिस अर्थ इंडिया इको टुरिझम किताब

एकमत ऑनलाईन

नांदेड : दिल्ली येथील डिव्हाइन ग्रुप यांच्यातर्फे होत असलेल्या मिस अर्थ इंडिया-२०२० स्पर्धेत नाशिकच्या श्रीया स्वप्नील तोरणे हिने मिस अर्थ इंडिया इको टुरिझम हा किताब आणि मुकूट पटकविला आहे. या अगोदरच्या फेरीमध्ये बेस्ट रॅम्पवॉक हे सबटायटल देखील जिंकले होते.

या स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर तिला भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची संधी आहे. मिस अर्थ इंडिया-२०२० स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देशभरातील असंख्य युवतींनी सहभाग नोंदविला होता. यातून पात्रता फेरीसाठी ४० युवतींची निवड करण्यात आली होती. पुढील १५ स्पर्धकांची निवड करत त्यांच्याकडून विविध आव्हाने पार पाडण्यात आली. या स्पर्धेकरिता वेगवेगळया क्षेत्रातील तज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

दरम्यान, या पंधरा स्पर्धकांमधून अंतिम सहा उमेदवारांची निवड करण्यात आली होती. तिने यापूर्वी मिस टीन युनिव्हर्स इंडिया, मिस टीजीपीसी इलाइट या राष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पधेर्साठी तीने इंस्टाग्रामवर सुरु केलेल्या या निसर्ग संवर्धन करुन आपले मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले राखा या संकल्पनेचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात आले.

कळंब च्या कू. पौर्णिमा मोहिते यांची चित्रातून वेगळी ओळख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या