36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeनांदेडकोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘मिशन ब्रेक दि चैन’

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘मिशन ब्रेक दि चैन’

एकमत ऑनलाईन

धमार्बाद : गेल्या चार महिन्यांपासून येथील प्रशासन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्याने तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचा एकही पाझिटिव्ह रूग्ण आढळून आला नाही.यापुढेही कोरोनाचा एकही पाझिटिव्ह रूग्ण आढळून येणार नाही,याची काळजी तहसिलदार डि.एन.शिंदे यांनी घेतली आहे.व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार मिशन ब्रेक दि चैन मोहीम शहरात राबविण्यासाठी आठ पथक तयार केले आहेत़ कोरोनाचे नियम मोडणाºयावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव जलदगतीने वाढत असल्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी मिशन ब्रेक दि चैन मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याच्या सुचना दिल्यामुळे सदरील सुचनेनुसार येथील तहसिलदार डि.एन.शिंदे यांनी गुरुवारी तहसिल कार्यालयात बैठक घेतली आहे.या बैठकीत महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन व नगरपरीषदेचे कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाच पथक व पथक प्रमुख तयार करण्यात आले आहे.

सदरील पथकातील अधिकारी व कर्मचारी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत दिलेल्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करणे.यात सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास परिधान न करणे व सामाजिक अंतराचे पालन न केल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रु दंड आकारण्यात येणार आहे.दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास ५०० रू.पर्यत दंड,तीन चाकी वाहनात चालकासह तीन पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास १००० रु पर्यत दंड,चार चाकी वाहनात चालकासह तीन पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास १००० रु.पर्यत दंड,ताळेबंदीच्या कालावधी मध्ये परवानगी देण्यात आलेल्या दुकानात पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास ५ हजार रुपय पर्यत दंड, दुकानातील कर्मचा-यांच्या चेह-यावर मास व सामाजिक अंतर नसल्यास ५ हजार रुपय दंड, उपरोक्त प्रमाणे सोपविलेली जबाबदारी पार पाडावे,याकामात हलगर्जीपणा व निष्काजीपणा तसेच कामचूकारपणा केल्यास आपल्या विरोधात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि नैसर्गिक अपत्ती नियंत्रण कायदा २००५ अन्वेय कार्यवाही करणार असल्याचे आदेश तहसिलदार डि.एन.शिदे यांनी दिले.

मिशन ब्रेक दि चैन मोहीमेत आठ पथक तयार करण्यात आले आहे.यात मंडळ अधिकारी नामदेव माळोदे,कार्यालयीन अधीक्षक बाबूराव केंद्रे,वरीष्ठ लिपीक मोकले सुर्यकांत, नगररचनाकार सचिन सावंत,राम मुळे,कर निर्धारक रुकमाजी भोगवार, भीमराव सुर्यवंशी, अविनाश सोनकांबळे, अभियंता नरेश काटकर,लक्षमण झुंझारे,राजू कटके, अभियंता स्वामी राजू,गुरुलिंगप्पा कर निर्धारक,मुत्यन्ना लखमावाड, राजरत्न सुर्यवंशी, लेखा परिक्षक गुरूनाथ कस्तुरे,दत्तू गुर्जलवाड, सुरेश कोटारे,कर निर्धारक मनोहर तुंगणीवार, नितीन धावणे,कांता उशलवार यांचा समावेश आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तहसिलदार शिंदे यांनी सुरूवाती पासूनच अहोरात्र परिश्रम घेतले आहे.तसेच येथील आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन व नगरपरीषदचे मुख्याधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेतल्यामुळे धमार्बाद तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचा एकही पाझिटिव्ह रूग्ण आढळून आला नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या