22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडआ.राजूरकरांना पूणे महापालिकेचा दणका

आ.राजूरकरांना पूणे महापालिकेचा दणका

एकमत ऑनलाईन

नांदेड : पुणे महापालिकेने शहर पोलिसांसोबत विनामास्क फिरणा-याविरूध्द आणि थुंकी बहाद्दरांविरूध्द जोरदार मोहिम सुरू केली आहेग़ुरूवारी सकाळी आपल्या अलीशान मोटरीमधुन चार मित्रांसह विनामास्क जात असलेल्या नांदेडचे आमदार अमरनाथ राजूरकर यांना पालिका व पोलिस कर्मचा-यांनी चांगलाच दणका दिला असुन आमदारांकडुन ५०० रूपये दंड वसुल करण्यात आले आहे. आ. राजुरकरांनी यावेळी आपण आमदार असल्याचे सांगीतल्यानंतरही कर्मचा-यांनी कुठल्याही धमकीला न भिता दंड थोपाटल्यामुळे पुणेकरांमध्ये कर्मचा-यांचे कौतुक केल्या जात आहे.

राज्यात सर्वत्र कोरोनाने कहर निर्माण केला असून या तावडीतुन दस्तुरखुद आमदारही सुटले नव्हते. काही दिवसांपुर्वीच ते कोरोना पॉझिटीव्ह म्हणून त्यांनी उपचार घेतला असतांनाही आज मात्र बिनदिक्कतपणे मास्क न लावता मुंबई , पुणे, नांदेड, औरंगाबाद आदी ठिकाणी दौरे करत आहेत. पुणे येथे मोठ्या प्रमाणात कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका शर्यतीचे प्रयत्न करीत आहे. पोलिसांच्या मदतीने विनामास्क फिरणा-या नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंड वसुलीची कारवाई सुरू आहे.

आत्तापर्यंत पुणे येथे २० हजारापेक्षा जास्त लोकांकडन्ुा दंड वसुल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कोथरूड पोलिस स्टेशनचे कर्मचारी शास्त्री नगर चौकामध्ये कारवाई करत होते. गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास अलीशान मोटरमधुन (एम.एच.२६ बी.आर ५९९९) या गाडीतुन चौघेजण विमा मास्क जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वाहनचालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. परंतू वाहन चालकाने गाडी थांबविली नाही. भरधाव वेगाने पुढे नेली असता गाडीतील सर्व विनामास्क असल्याने पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी अडविली.

महापालिकेच्या कर्मचा-यांनी आपण विनामास्क फिरत आहात आपणास दंड भरावा लागेल, असे सांगीतले असता चालकाने कर्मचा-याशी अरेरावीची भाषा केली. गाडीमध्ये आमदार बसले आहेत, लक्षात ठेवा, पुढील अनर्थ होण्याआगोदरच सावधा व्हा,अशा सुचनाही केल्या यावेळी ऐकण्याच्या भुमिकेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा नियम राज्य शासनाने केलेला असुन सर्वसामान्य नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना सारखाच आहे, असे सांगीतले. यानंतरही आमदार संतापले, धमकी दिली, तरीही आपण आमदार आहात आपणासही कोरोना होवु शकतो आपण मास्क लावा,असे सुचित केले तरीही आमदारांनी एकले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ५०० रूपयांची दंडात्मक पावती फाडल्यानंतर व पुर्ण पैसे वसुल केल्यानंतर त्यांची गाडी सोडण्यात आली. कर्मचा-यांच्या धाडसाचे कौतुक मात्र पुणेकरांनी टाळ्या वाजवुन केले.

खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोर्चाचे बार्शीत अर्धनग्न आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या