23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडआमदार शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

आमदार शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

एकमत ऑनलाईन

कंधार : कंधार लोहा मतदार संघात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कंधार लोहा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यांचे पुत्र युवा नेते विक्रांतदादा शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

कंधार लोहा मतदारसंघातील कंधार तालुक्यात ४४ हजार ९५६ शेतकरी बाधित असून२४ हजार १०० हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, १५ हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून २४ हजार ११५ हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे .

लोहा तालुक्यात ४१ हजार २०० शेतकरी बाधित असून२२ हजार ८०० हेक्टर जिरायत बाधित क्षेत्रअसून २२ हजार ८०० हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र झाले असून अतिवृष्टीशी संभावना लक्षात घेऊन महसूल यंत्रणेला दक्ष राहण्याची सूचना केली .

मतदारसंघातील मारतळा, चिंचोली, हातनी, येळी, कापसी (बु), गोळेगाव,उस्माननगर, शिराढोण, करमाळा, मंगलसांगवी, नंदनवन, औराळ, सावळेश्वर व चिखली येथील लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांनी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आणि नाबार्ड अंतर्गत कापसी (बु )येथील झालेल्या पुलाची पाहणी केली.

नुकसान झालेल्या पुलाची लवकरात लवकर सुधारणा करावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात यावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक ,तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह कार्यकर्ते, गावकरी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या