नांदेड : एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायाला घरघर लागली, अनेकांनी नोक-या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती तर दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण ह्या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीजबिल पाठवून शॉक दिला आणि जनतेचे डोळे पांढरे झाले. एरवी वर्षभराचं वीज देयक जितके येते तितक्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकाने जनतेला पाठविली. एप्रिल, मे. जून महिन्यांत अनेक खाजगी आस्थापनांची कार्यालये बंद होती, पर तरीही त्यांना भरभक्कम वीज देयके पाठविली, या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऊजार्मंत्र्यांची भेट घेऊन वीज बिल माफ करण्याची विनंती केली होती, परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऊजार्मंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ अशी घोषणा केली होती, मात्र यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तरी त्वरित वीज माफी देऊन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिका-्यांना निवेदन देण्यात आले.
या आक्रोश मोर्चात मनसे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंघ जहागीरदार, शहर अध्यक्ष अब्दुल शफीक, रवी राठोड, उषा नरवाडे, संतोष सुनेवाड, राजू बरडे, सुभाष भंडारे, पप्पू मनसुके, शक्ती परमार, अनिकेत परदेशी, महेश ठाकूर, बालाजी एकलारे, सिनू एडके, फारूखभाई, सय्यद गफूर, प्रवीण मंगनाळे, संतोष बनसोडे, माधव पावडे, पांडुरंग कोल्हेवाड, व्यंकट वडजे, राहुल शिंदे, ज्योती चव्हाण, यास्मीन शेख, वंदना गायकवाड, रूक्मीनबाई दुधकावडे, कमलबाई कोल्पे, कुलदीप पवार, दत्तात्रय कवाडे, मयूर गाडे, शेख अझहर, शिवाजी सातेगावकर, बंटी कांबळे, अशोक उमाटे, नारायण गायकवाड आदींची उपस्थिती होती.
सांगोला तालुक्यातील ४५ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत जमा