नांदेड : बीआरएसची सभा उधळून लावण्याचा इशारा देणा-या मनसे कार्यकर्त्यांना रविवारी सकाळी वजीराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले.
नांदेड येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षाची सभा होत आहे. मात्र शनिवारी शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री राव यांनी बाभळी बंधा-यातील पाणी वाटपाबाबत भुमिका स्पष्ट करावी नंतर सभा घ्यावी, अशी मागणी करीत रविवारी होणारी सभा उधळून लावू असा इशारा दिला होता.
सभा स्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सर्तक झाले होते़ सकाळी घोषणाबाजी करीत निघालेल्या मनसेच्या पदाधिकारी व कार्यकत्यार्ना वजीराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले.