नांदेड : प्रतिनिधी
शहरात पाकीटमार आणि भुरट्या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. गर्दीच्या ठिकाणी अनेकांचे मोबाईल, पाकीट, दागीने लंपास होत असून, दि.१० रोजीही रात्री १ वाजेच्या दरम्यान बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा मोबाईल आणि नगदी रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
संतोष केंद्रे रा. ब्रम्हवाडी ता.अहमदपुर हे दि. १० रोजी रात्री नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून अहमदपुरला जाणा-या बसमध्ये चढत होता. यावेळी बसमध्ये चढता थोडी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १५ हजार रूपये किंमतीचा एक मोबाईल आणि नगदी १८०० रूपये अशा १६ हजार ८०० रूपयाच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हाथसाफ केला. या प्रकरणी संतोष केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोहेकॉ राठोड हे करीत आहेत.