32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडदोन टोळीविरुद्ध मोक्काची धाडसी कारवाई

दोन टोळीविरुद्ध मोक्काची धाडसी कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून शहरातील मोठे व्यापारी,डॉक्टर यांना खंडणी मागण्याचे प्रकार वाढले होते.यासाठी शस्त्रांसह पिस्तुलचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमकी दिल्या जात होत्या.यातुन गोळीबाराच्या घटनाही घडल्या.याची गंभीर दखल घेत दोन टोळीविरुद्ध मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन गुन्हेगारांना दणका दिला आहे. या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगा-यांचे जाळे हादरले आहेत.

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारताच अवघ्या काही दिवसात जुना मोंढा भागात दिवसाढवळ्या एका टोळीने व्यापा-यावर फिल्मीस्टाईल फायरिंग करुन दहशत पसरली होती. यावेळी या गोळीबारात आकाशसिंह राजेशसिंह परीहार हा पानठेलाचालक जखमी झाला होता. ही घटना दि.४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जुना मोंढा परिसरातील महाराजा रणजीतसिंह मार्केट येथे हे घडली होती. यावेळी हल्लेखोरांनी विजय मोहनदास धनवानी (वय ३७) यांच्या दुकानात घुसून जबरीने १० हजार लंपास केले होते.

घटनास्थळाला पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवारा पोलिस ठाण्याचे साहेबराव नरवाडे यांनी तातडीने भेट दिली. घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी आरोपी पोलिसांच्या नजरेत निष्पन्न झाले. रात्रीच नाकाबंदी करुन आरोपींची धरपकड केली होती. यात पहिल्या टोळीतील विशाल गंगाधर आंबे (वय २२) राहणार शिवशक्तीनगर, कलामंदिर, नांदेड, आदर्श उर्फ आद्या अनिल कामटीकर (वय २०) राहणार महाविर चौक नांदेड, संजू किसन गुडमलवार (वय २४) राहणार गुरुद्वारा गेट क्रमांक तीन, धनराजसिंह उर्फ राणा दीपकसिंह ठाकूर (वय १८) राहणार शिवशक्तीनगर, कलामंदिर नांदेड, लखन दशरथसिंह ठाकूर (वय २८) राहणार गुरुद्वारा गेट क्रमांक दोन चिखलवाडी आणि प्रसाद नागनाथ अवधूतवार (वय १९) राहणार गुरुद्वारा गेट क्रमांक दोन चिखलवाडी यांना गजाआड केले.या आरोपींकडून त्यांच्या अंगावरील कपडे, दोन पिस्टल, चार जिवंत काडतुस, तीन दुचाकी, एक खंजर आणि नगदी दहा हजार रुपये असा ऐवज जप्त केला होता. या गुन्हेगारांची वाढती गुन्हेगारी व त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याकडे पाठविला. उपमहानिरीक्षक तांबोळी यांनी तात्काळ मंजुरी देत या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यास आदेश दिले. यावरुन इतवारा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वाढ करुन त्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे करत आहेत.

तर दुस-या एका अपहरणाच्या गुन्ह्यात लोहा पोलिस ठाणे अंतर्गत दुस-या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.दि.५ ऑगस्ट रोजी चारच्या सुमारास सायाळ रोड, लोहा येथून जमुनाबाई संतोष गिरी वय ३५ यांचा मुलगा शुभम वय १६ व तिच्या बहिणीचा मुलगा विजय प्रभू गिरी वय १८ यांचे आरोपीतांनी संगनमताने कट रचून पैशासाठी अपहरण होेते.अपहृत मुलाची तीन दिवस टाटा सफारी एमएच २४ के-०००८ विविध ठिकाणी घेऊन फिरत असताना अपहरत मुलगा आरोपीच्या ताब्यातून सोडत असताना दि.७ ऑगस्ट रोजी दुपारी साडे पाचच्या सुमारास आरोपींनी लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मरळक शिवारात पोलिसांच्या अंगावर गावठी कट्टा, खंजर, लाकडी दांडके घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक गुन्हे शाीखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी विकास हटकर याच्या पायात गोळी लागून जखमी झाला.

यानंतर त्याच्या ताब्यातून या दोन्ही मुलांची पोलिसांनी सुखरुप सुटका करण्यात आली होती. या प्रकरणाचा लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीयुद्ध लोहा पोलिसांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशावरुन विकास सुभाष हटकर (वय २६) राहणार पांगरी, विष्णूपुरी ता. नांदेड देड, धोंडिराज ऊर्फ बंटी सूर्यकांत नवघरे (वय २३) राहणार हडको, सुरज तुकाराम मामिडवार (वय २३) राहणार बंदा घाट नांदेड, शेख असिफ शेख छोटुमिया राहणार सुनेगाव तालुका लोहा, दत्ता हंबर्डे राहणार विष्णुपुरी नांदेड आणि गोविंद निळकंठ पवार राहणार पार्डी तांडा तालुका लोहा यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढ करुन मोक्काची कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करत आहेत. पोलीस अधिक्षकांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारांचे जाळे हादरले आहे.

महावितरण कार्यालयासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या