19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडजनतेच्या समस्यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष : पटोले

जनतेच्या समस्यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष : पटोले

एकमत ऑनलाईन

नांदेड : जनतेच्या समस्या सोडवण्याकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खा. राहुल गांधी यांच्याकडे सर्वसामान्य जनता आपल्या व्यथा व्यक्त करीत आहेत. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणानंतर महाराष्ट्रात जनतेचा या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून भारत जोडो यात्रा ही जनयात्रा झाली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

हिंगोली जिल्ह्यात ही पदयात्रा मार्गक्रम करीत पुढे गेल्यानंतर रविवारी नांदेड येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, जीएसटी, चीनने भारताच्या हद्दीत केलेले अतिक्रमण या देशातील ज्वलंत समस्यांवर केंद्रातील मोदी सरकार गप्प आहे. यामुळे भाजपा सरकारच्या या नाकर्तेपणावर जनतेमध्ये रोष असल्याचे या पदयात्रेच्या माध्यमातून समजत आहे. या लोकभावनाच आता भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करतील, असे म्हणाले.

भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भाजपाचे नेते टीका करत आहेत. पण या पदयात्रेला मोठे जनसमर्थन देऊन जनताच भाजपाला चोख उत्तर देत आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेचे समर्थन केले आहे. पण भाजपाच्या काही लोकांचा या यात्रेला मिळणारे समर्थन पाहून जळफळाट होत आहे. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी प्रदेश काँग्रेसह नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने चोख नियोजन करून जिल्ह्यात यात्रा यशस्वीपणे पार पाडली.

एवढी मोठी यात्रा व त्याला मिळालेला जनतेचा पांिठबा अपेक्षेपेक्षाही जास्त होता. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा माझ्यासह अनेकांसाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. या पत्रकार परिषदेस माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, यात्रेच्या माध्यम विभागाच्या महिमा सिंह, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सोशल मीडियाचे विशाल मुत्तेमवार आदीसह इतरांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या