33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली . कंधार लोहा तालुक्यात भाजपाचा वरचष्मा निर्माण झाला असून नांदेड जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे .आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हळदा गावात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वांने आमदार शामसुंदर शिंदे यांच्याविरुद्ध बाजी मारली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ओळखल्या जाणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकाना जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला होता . नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत अटीतटीच्या झाल्या . कंधार लोहा या दोन्ही तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या तर नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात भारतीय जनता पाटीर्चे उमेदवार प्रचंड मताने विजय झाले आहेत. अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणा-्या ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या. कंधार तालुक्यातील बोरी खुर्द ,बामणी, लाठ खुर्द, चिंचोली, शेकापूर, गुंडा, राऊतखेडा, हरबळ ,कळका ,बोरी बुद्रुक आणि आमदार शामसुंदर शिंदे यांच्या गावच्या हळदा ग्रामपंचायतीवरही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पाटीर्ने विजय प्राप्त केला. लोहा तालुक्यातील धनज खुर्द ,सुगाव, कारेगाव, टेळकी, वडगाव, बोरगाव, पिंपळदरी, मांजर सांगवी, किवळा, बोरगाव, किवळा ,टाकळगाव, सावरगाव, किरोडा ,येळी ,हातनी, आडगाव ,वडेपुरी, शेलगाव ,अडगा ,माळेगाव यात्रा आणि धानोरा या ग्रामपंचायतीत भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर ,हादगाव ,किनवट ,माहूर यासह तालुक्यात भारतीय जनता पाटीर्ने बाजी मारली तर काँग्रेसच्या ताब्यात गेल्या अनेक वषार्पासून असलेल्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे . खासदार प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचली असून स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात भाजपाने विजय मिळवला आहे .निवदून आलेल्या सर्व सदस्यांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अभिनंदन केले आहे.

लोहा : तालुक्यातील ७७ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या तालुक्यात जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे तालुक्यातील सावरगाव ,वडेपुरी ,ढाकणी, किवळा, मारतळा माळेगाव यासह ४२ ग्रामपंचायतीवर भाजपा व खासदार चिखलीकर समर्थकांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

कंधार- लोहा तालुक्यात प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे निर्विवाद वर्चस्व आहे दीड वषार्नंतरही या भागातील जनतेने चिखली करा वरील प्रेम कायम ठेवत त्यांच्या समर्थकांच्या गावचा कारभार दिला आहे. तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणा-्या सावरगाव (न )वडेपुरी, किवळा ,माळेगाव ढाकणी ,टेळकी यासह ४२ ग्रामपंचायतीवर भाजप व चिखलीकर समर्थकांनी विजय संपादन केला आहे डोनवाडा, झरी, धानोरा मक्ता धनज, मारतळा, शेलगाव ,वडेपुरी आडगाव, येळी, किरोडा, टाकळगाव ,सुगाव बोरगाव, (की) किवळा, बोरगाव(आ) मजरेसांगवी, पिंपळदरी, कारेगाव, धनज खुर्द हळदव, चितळी, पांगरी ,ढगे पिंपळगाव वडगाव, माळाकोळी, गोळेगाव यासह विजयी उमेदवार समर्थकांनी खासदार चिखलीकर यांच्या लोहा स्थित संपर्क कार्यालयात भेट देऊन आनंदोत्सव साजरा केला.

लोहा कंधार चे युवा नेते माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष केशव मुकदम, भाजपा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल नगरसेवक दत्ता वाले ,बालाजी शेळके भानुदास पवार, सूर्यकांत गायकवाड यासह प्रमुख पदाधिका-्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.

लोहा कंधारच्या जनतेचा विश्वास कायम : खा चिखलीकर
लोहा : कंधार भागातील जनतेने मला मोठे केले मी पक्षाबद्दल येथील या भागातील मतदारांचा माज्यावर विश्वास आहे त्यात पाठबळावर मला जिल्ह्याचे खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली लोहा कंधार तालुक्यात सर्वाधिक व प्रमुख ग्रामपंचायतीवर भाजपा समर्थक माज्या कार्यकर्त्यांनी विजय संपादन केला आहे हाच विश्वास विकासकामासाठी कायम राहील या दोन तालुक्यातील जनतेचे आभार नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मानले.

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश; आम्हीच नंबर वन असल्याचा भाजपाचा दावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या