26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडमोटार वाहन निरीक्षकास वीस हजाराची मागणी, खंडणीखोर पदाधिका-यास पकडले

मोटार वाहन निरीक्षकास वीस हजाराची मागणी, खंडणीखोर पदाधिका-यास पकडले

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रादेशिक परिवहन कार्यालयायातील मोटार वाहन निरीक्षकास २० हजाराच्या खंडणीची मागणी करणा-या अ़भा़ मराठा महासंग्राम संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष विक्रम पा़बामणीकर यास ग्रामीण पोलीसांनी रंगेहाथ पकडले़ त्याच्याविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ या कारवाईने जिल्ह्यातील अनेक खंडणी बहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत़

दि़७ सप्टेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रादेशीक परीवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक पंकज लक्ष्मणराव यादव (वय ३४) यांनी तक्रार केली की, विक्रम पा़बामणीकर (मराठवाडा अध्यक्ष अ.भा. मराठा महासंग्राम संघटना) हा दि़ १७ ऑगस्टपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्याविरुध्द उपोषणास बसले आहेत. उपोषणा दरम्यान विनाकारण कार्यालयात येवुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असून, त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी सहा. आर.टी.ओ. निमसे यांचे कॅबीनमध्ये आम्हास २५ हजार रुपये खंडणीची मागणी केली़ तडजोडी अंती २० हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले.

परंतु खंडणी देण्याची इच्छा नसल्याने मी आर.टी.ओ. कामत यांना सदर प्रकरणाची माहिती दिली़ त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना दिली़ तेव्हा त्यांनी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना सदर प्रकरणी कारवाईचे दिले.

त्यानुसार पोनि घोरबांड यांनी कायदेशीर कारवाई करणे करीता पोउपनि आनंद बिचेवार, पोहेकॉ प्रमोद क-हाळे आदींचे पथक तयार करुन, लातुर फाटा येथे रवाना झाले. उपोषणकर्ता विक्रम पाटील हे हॉटेल पूजा गार्डन येथे आले असता, पंचानी ७.१० वाजता सापळा लावला. त्यावेळी विक्रम पाटील यांनी तक्रारदार यांना उपोषण मागे घेण्यासाठी २० हजार रुपये खंडणीची मागणी केली़ व खंडणीची रक्कम स्विकारल्यानंतर तक्रारदार यांना आपण सदरचे उपोषण मागे घेत असल्याचे सांगीतले. त्यावेळी पोउपनि बिचेवार व त्यांचा स्टॉफ असे तात्काळ त्याठिकाणी जावुन विक्रम पाटील बामणीकर यांना जागीच पकडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या