22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडमोटारसायकल चोरणारा अटकेत; ६ मोटारसायकली जप्त

मोटारसायकल चोरणारा अटकेत; ६ मोटारसायकली जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ होत असतानाच गुन्हे शोध पथकाने एकाला अटक करून त्याने चोरलेल्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर १५५/२०२२ कलम ३७९ भादवि गुन्ह्याचा तपास करीत असतांना गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाल्यानंतर नई आबादी परिसरात सापळा लावला. यात फैसल चाउस पि.सालेह चाउस (वय १९ वर्षे रा. मकदुमनगर, नई आबादी) यास ताब्यात घेतले. आरोपीने जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकल चोरल्याची माहिती मिळाल्याने त्यासंबंधाने आरोपीस विचारपूस केल्यानंतर त्याने याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची माहिती अशी : बजाज प्लसर कंपनीच्या ०२ मोटार सायकल, हिरो होंडा पॅशन प्लस कंपनीची १ मोटार सायकल, सुझुकी अ‍ॅक्सेस कंपनीची १ स्कुटी, होन्डा लिव्ही कंपनीची १ मोटार सायकल व यामाहा एफ झेड कंपनीची १ मोटार सायकल. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलीची किंमत ३ लाख ३९ हजार रुपये असून या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ जी. आर. मठदेवरु, मदतनिस पोहेकॉ संदिप राठोड करीत आहेत.

पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर देशमुख व स.पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहा.पोलीस निरीक्षक रवि वाहुळे , पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ इब्राहीम शेख, आर.पी.मोरे, डी.बी.राठोड, देविसींग सिंगल, काकासाहेब जगताप यांनी ही कामगिरी पार पाडली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या