नांदेड : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी तिव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
नाईक तांडा फाटयावर निर्दशने.
ईस्लापुर : अखिल भारतीय किसान संघर्ष समनव्य समितीने राज्यभर शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी या आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी नाईकतांडत्त फाट्यावर तिवृ निदेर्शने करण्याात आली. आंदोलनात शेतकरी नेते कॉ. खंडेराव कानडे, प्रभाकर बोड्डेवार, शेषेराव ढोले, शंकर राठोड, राहुल नाईक,द्यानेश्वर राठोड,ओम राठोड ,दिलीप जाधव, कारभारी ,मधुकर राठोड, नारायण चोपलवाड ,देविदास भट्टेवाड, विशाल आडे यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधार्पूरात काँग्रेसचे धरणे आंदोलन
अधार्पूर : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतक-्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असताना अधार्पूर तालुका काँग्रेसच्या वतीने दि. ३ डिसेंबर रोजी अधार्पूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालासाहेब पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव उमेश सरोदे, माजी सरपंच चंद्रमूनी लोणे यांच्यासह तालुक्यातील आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोकरमध्ये आंदोलनास प्रतिसाद
भोकर : शेतक-यांच्या आंदोलनास भोकर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा पाठींबा असल्याचे तहसिलदार यांच्या मार्फत केंद्रीय कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी अनेकांनी केंद्र सरकार शेतक-्यांच्या हिताचे नसल्याची टीका केली. धरणे आंदोलनात माजी सभापती गोविंद पाटील गौड, उपसभापती गणेश राठोड,सुभाष पाटील किन्हाळकर, रामचंद्र मुसळे, मारोतराव बल्लाळकर, सुर्यकांत बिल्लेवाड, खाजु इनामदार, मिर्झा ताहेर बेग, गोविंद देशमुख, राजु पाटील दिवशीकर, अॅड. मुजायद इनामदार, शफी इनामदार, शारूख सौदागर, सिध्देश्वर पिटलेवाड, नाना पाटील, गंपू पाटील, गोविंद मेटकर,हानमंत कदम,आरेफ इनामदार, माधव अमृतवाड, मधुकर गोवंदे, गौतम कसबे, आनंद ढवळे, रंगराव पाटील, बंडु गाडेगावकर, शेख साबेर, संजय चिंतावार ,आदीनाथ चिंताकुटे, नईम तळेगांवकर, फारुख करखेलीकर, बाबुराव राठोड, ऋषीकेष स्वामी, आदीसह असंख्य कार्यकर्त , शेतक-्यांचा सहभाग होता.
माहूर येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन
माहुर : आंदोलनात अखील भारतीय किसान सभा , प्रहार, किसान युवा क्रांती संघटना, वंचित बहुजन आघाडी, एस.एफ.आय. ही विद्यार्थी संघटनांना, सिटु कामगार संघटना सहभागी झाले होते. यावेळी कॉमरेड शंकर सिडाम, जिल्हा सचीव किसान सभा , कॉ. किशोर पवार, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ. बाबा डाखोरे, कॉ.राजकुमार पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.परसराम पारडे ,कॉ.अमोल आडे, कॉ.कादर खान ,कॉ.राजु राठोड ,कॉं. चंद्रभान निलेवाड , कॉ. कालिदास सोनुले, कॉं.प्रफुल्ल कऊडकर, कॉ.डिंगाबर कांबळे, प्रशांत शिंदे ,मृणाल येवृतकर, सुरेश आत्राम ,दादाराव गायकवाड सह मोठ्या प्रमाणात शेतकरी कार्यकर्ते हजर होते.
लोहा – कंधार मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन
लोहा : लोहा व कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तिवृ आंदोलन करण्यात आले. झाली असून लोहा व कंधारमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकार निषेधार्थ कृषी विधेयक कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी व दिल्ली येथील संयुक्त शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
लोहा येथे काँग्रेसचे लोहा पंचायत समितीचे गटनेते श्रीनिवास मोरे, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद सभापती श्रीनिवास बंडेवार , काँग्रेसचे न.पा. गटनेते पंचशील कांबळे, तालुका उपाध्यक्ष किशनराव पाटील लोंढे, उपसरपंच मधुकर पाटील दिघे ,माजी नगरसेवक उत्तम महाबळे, माजी नगरसेवक बाबुमिया कुरेशी, माजी नगरसेवक पंकज परिहार, माजी नगरसेवकाने अनिल दाढेल, पांडुरंग दाढेल, युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर, दत्ता पाटील दिघे, हरी पाटील शिंदे ,भूषण दमकोंडवार, गजानन कळसकर, पांडुरंग शेटे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर गवळी, माजी सरपंच आर.आर.पाटील भुजबळ, मोहन सोनकांबळे, दत्ता फुलपगार, शंकर जोडराणे, व्यंकट पाटील पवार, विक्रांत नळगे अमोल महामुने, आदी उपस्थित होते.
सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलें यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार