22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeनांदेडमनपाच्या स्वच्छता कर्मचा-यांचे आंदोलन मागे

मनपाच्या स्वच्छता कर्मचा-यांचे आंदोलन मागे

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांचे पगार दोन महिन्यांपासून थकल्यामुळे शहरातील जवळपास ३०० स्वच्छता कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरु केले होतेÞ याबाबत एकमत लाईव्हने वृत्त प्रसिद्ध करताच वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त डॉÞसुनील लहाने यांनी स्वच्छता कर्मचा-यांच्या कांही मागण्या मान्य करत, सोमवारी पगार देण्याचे आश्वासन दिलेÞ त्यामुळे तूर्त काम बंद आंदोलन शुक्रवारी सायंकाळी माघे घेत असल्याची घोषणा संघटनेच्यावतीने करण्यात आली.

शहरातील घंटागाडीवर काम करणारे वाहनचालक यांच्यासह जवळपास ३०० कर्मचा-यांनी शुक्रवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरु केलेÞ त्यामुळे शहरातील कचरा उचलणा-या ९० छोट्या घंटागाड्या त्याचबरोबर ४०७ वाहने, १२ ट्रॅक्टर, ९ मोेठे आरसी वाहन हे शुक्रवारी सकाळपासूनच बंद करण्यात आले होते.

जवळपास १५० वाहनामधुन शहरातील सिडको- हडको भागासह शहरातून कचरा गोळा केला जातो. कर्मचा-यांनी शुक्रवारी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत एकमत लाईव्ह मधुन शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध होताच, महापालिका आयुक्तांनी या वृत्ताची त्वरित दखल घेवुन कामगार संघटनेच्या पदाधीकारी यांच्यासोबत चर्चा करून काही मागण्या मान्य केल्या आहेतÞ तर सोमवारी थकीत एका महिण्याचा पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सदर आंदोलन मागे घेतले असल्याची माहीती संघटनेचे प्रमुख गणेश शिंगे यांनी दिली. आंदोलन मागे घेण्यासाठी आतिरीक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त सुंकेवार लेखा परीक्षक भिसे यांनी सहकार्य केलेÞ आंदोलनात गणेश शिगें, कंपणीचे संचालक आशोक पाल,आवताडे, संदीप पाईकराव यांच्यासह अनेक कर्मचा-यानी सहभाग नोंदवला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या