मुखेड: शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ होत असताना ज्या ठिकाणी नगरपरिषदेकडून औषध फवारणी करणे अपेक्षित असताना त्याची वाट न पाहता शहरातील एका व्यापा-यांनी स्व:खचार्तून वॉर्डात औषध फवारणी करून सर्वांना एक चांगला संदेश दिला आहे.
मुखेड तालुक्यात सह शहरात मागील महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना संक्रमित रुग्ण आढळलेल्या वॉर्डांमध्ये नगरपरिषदेकडून औषध फवारणी करून तो भाग निजंर्तुकीकरण केला जात आहे. मात्र ज्या भागात कोरोना संक्रमित रुग्ण आढळले नाहीत या भागात खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेकडून कुठलीही औषध फवारणी केली जात नाही.
हीच बाब लक्षात घेऊन मुखेड शहरातील युवा व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बंडे यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना लक्षात घेऊन स्वखचार्तून त्यांच्या वॉडार्तील सर्वच भागात औषध फवारणी करून पूर्ण वार्ड निजंर्तुकीकरण करण्याचे काम केले आहे . त्यांच्या या निस्वार्थी सामाजिक कायार्ची मुखेड शहरात सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्या या सत कायार्ने मुखेड करांना वेगळा संदेश दिला आहे.
Read More पुरात वाहून गेलेल्या शेतक-याचे प्रेत ४८ तासानंतर सापडले