24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeनांदेडमुखेड शहरवासीय पाळणार पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

मुखेड शहरवासीय पाळणार पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

एकमत ऑनलाईन

मुखेड: मागील चार-पाच दिवसात मुखेड शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आळा बसविण्यासाठी आ. डॉ. तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रशासन व व्यापाº्यांच्या बैठकीत पुढील पाच दिवस मुखेड शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला़ या काळात मोठ्या बाजारपेठा कडकडीत बंद राहणार आहेत.

मुखेड शहरासह तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून मोठ्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. मुखेड तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या अर्धशतकापार पोहोचली असून, आजाराचा प्रसार ग्रामीण भागातही होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुखेड शहरातील एकाच कुटुंबियातील १२ सदस्यांना कोरोनाचे संक्रमण झाले़ यामुळे मुखेड शहरातील नागरिक हादरून गेले आहेत.

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आ. डॉ. तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी व्यापारी व प्रशासनाची एक बैठक आर्य वैश्य मंगल कार्यालयात पार पडली यात पुढील पाच दिवस मुखेड शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोरोना संक्रमणावर कशी मात करता येईल यावर आमदार डॉ. राठोड तहसीलदार काशिनाथ पाटील, डॉ. दिलीप पुंडे, पोलीस निरीक्षक निरिक्षक नरसिंग अकोसकर आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोरसिंह चौहाण यांनी जनता कर्फ्यू पाळताना काही व्यापारी छुप्या मार्गार्ने चढ्या दराने आपल्या मालाची विक्री करत आहेत़याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे व जनतेची लूट व इतर व्यापाº्यांचे नुकसान टाळावे असे आवाहन केल़े या जनता कर्फ्यू मध्ये केवळ मेडिकल व दवाखान्यात सेवा चालू राहणार असून बाकी सर्वच व्यावसायिक सेवा बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले. जनता कर्फ्यूमध्ये काही व्यापारी छुप्या मागार्ने व्यवसाय चालू ठेवतात असे अनेक वेळेस निदर्शनास आले आहे मात्र यापुढे असे झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई व आर्थिक दंड लावण्यात येणार आहे.

Read More  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘मिशन ब्रेक दि चैन’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या