31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeनांदेडमुंबई-किनवट विशेष रेल्वेचा अदिलाबादपर्यंत विस्तार

मुंबई-किनवट विशेष रेल्वेचा अदिलाबादपर्यंत विस्तार

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई-किनवट -मुंबई विशेष रेल्वे दि.१२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे.या विस्तारामुळे अदिलाबादपर्यंतच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या विशेष रेल्वे चा विस्तार आदिलाबाद पर्यंत करण्यात आला आहे. हि रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील. गाडी संख्या ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते आदिलाबाद – हि गाडी दिनांक १३ नोवेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी १६. ३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड, किनवट मार्गे अदिलाबाद येथे दुस-या दिवशी सकाळी ०९.३० वाजता पोहोचेल.

गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हि गाडी दिनांक १४ नोवेंबर २०२० पासून आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी १३.०० वाजता सुटेल आणि किनवट, हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुस-या दिवशी सकाळी ०५. ३५ वाजता पोहोचेल. हि गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा , हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्रकुंड, बोधडी बुज्रुग, किनवट येथे थांबेल. या गाडीस एकूण १८ डब्बे असतील.

या गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल. हि विशेष गाडी नियमित रेल्वे गाडी सुरु होई पर्यंतच असेल. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड-१९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

कुर्डूवाडी- भिगवण विद्युतीकरण मार्गाला हिरवा कंदील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या