28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeनांदेडमनपात गुंठेवारी प्रमाणपत्र घोटाळा

मनपात गुंठेवारी प्रमाणपत्र घोटाळा

एकमत ऑनलाईन

नांदेड : महापालिकेतील अधिका-यांच्या खोट्या स्वाक्ष-या करून बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र तयार केल्याचा घोटाळा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे. या घोटाळ्यात दोन मालमत्ताधारकासह दोन परवानाधारक अभियंता व मनपाच्या एका लिपिकाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी काही अशी बनावट प्रकरणे आहेत का याचा शोध महापालिका प्रशासनाकडून घेतला जात आहे.

शासन निर्णयानुसार महापालिकेअंतर्गत शहरातील मोकळ्या भूखंडांचे कायदेशीररित्या गुंठेवारी करण्यात येत आहे. परंतु ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दाखल झालेल्या दोन मालमत्ताधारकांनी काही जणांना हाताशी धरून अधिका-यांच्या खोट्या स्वाक्ष-या करून बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र बनविल्याचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहे. बनावट प्रमाण तयार करणारामध्ये मालमत्ताधारक कनिस फातेमा भ्र.मोहम्मद मसुद सौदागर (रा.मदिनानगर) यांनी संचिका क्रमांक १६२८८, जाŸक्रÞ६२५६, प्रमाणपत्र क्र.६३९० खोट्या स्वाक्ष-या करून फसवणूक केली.

असदुल्ला मोहम्मद इनायतुल्लाह (रा.गनिमपुरा) संचिका क्रमांक १६२०२, जा. क्रÞ ६२५५, प्रमाणपत्र क्र. ६३९१ या प्रमाणपत्रावर अधिका-यांच्या खोट्या स्वाक्ष-या करून बनावट गुंठेवारीचे प्रमाणपत्र बनविले. या मालमत्ताधारकांना मनपाचे परवानाधारक अभियंता शेख अरहराज फरहान अ.रियाज रा. व्हीआयपी रोड मस्तानपुरा व मÞदिलशाद कलीम आणि महापालिकेच्या गुंठेवारी विभागातील प्रभारी लिपिक गंगाधर जाधव या तिघांनी प्रमाणपत्र बनविण्यासाठी सहकार्य केले. या पाचही जणांविरूद्ध मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या