22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडघराबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून

घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून

एकमत ऑनलाईन

नांदेड (प्रतिनिधी) : घराबाहेर झोपलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. सदर घटना धनेगाव येथे २२ मे च्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष भागवत गायकवाड हे तिरुपती सोसायटी धनेगाव येथील रहिवाशी असून ते ट्रकची बॉडी बनविण्याच्या कामात वेल्टींगचे काम करतात. त्यांचे मुळगाव सोमठाणा ता.नायगाव हे आहे. त्यांचे वडील मागील २५ वर्षापुवी नांदेडला आले. स्वत:चा भुखंड घेवून त्यावर घर बांधले आणि सर्व कुटूंबीय तेथे राहतात. वडील भागवत शिवराम गायकवाड हे वाजेगाव येथे जमील शेठ यांच्या सॉ मिलवर काम करीत होते.

मुलाने दिलेल्या माहितीनूसार दि. २१ मे रोजी रात्री सर्व कुटूंबीय जेवल्यानंतर वडील भागवत गायकवाड हे आपल्या घरातील बांधकामासाठी वाळू चाळत होते. रात्री ११ वाजता लाईट गेली. नंतर १२.३० वाजता बहिणीचा रडण्याचा आवाज आला. तेव्हा पाहिले असता वडील शिवराम गायकवाड हे घराच्या दरवाज्याच्या उंब-यावर डोके टेकून होते, त्यांचे डोके फुटलेले होते. त्यांचे डोके ज्या दगडाने फोडले तो दगड तेथेच शेजारी पडलेला होता. मी व शेजा-यांनी वडीलांना तातडीने दवाखान्यात नेले.

तेथुन सरकारी रुग्णालयाकडे जातांना रस्त्यात एका खाजगी रुग्णालयात वडीलांची तपासणी करण्यासाठी नेले असतांना तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे सांगितले. वडील लाईट नसल्यामुळे घराबाहेरच्या उंब-याला टेकून पडले होते. त्यांच्या डोक्यावर दगड टाकून कोणी तरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणासाठी खून केला आहे,अशी फिर्याद दिली असून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याने हा खूनाचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सुरु झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या