24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडमहिलेचा खून करून प्रेत जाळले

महिलेचा खून करून प्रेत जाळले

एकमत ऑनलाईन

नांदेड जिल्ह्यातील खळबळजनक घटना; संशयावरून एकजण ताब्यात
तामसा : शेतात शेळ््या घेऊन गेलेल्या वृद्धमहिलेचा खून करून तिचे प्रेत जाळण्याचा धक्कादायक प्रकार वानवाडी (ता. हदगाव) शिवारात शुक्रवारी (ता.२७) घडला असून पुतण्यास संशयावरून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी शनिवारी पोलिस ठाण्यात गून्हा नोंदविण्यात आला आहे.

मयत वृद्धमहिलेचे नाव लक्ष्मीबाई दत्ता खूपसे (वय ५५) असून शुक्रवारी सकाळी लक्ष्मीबाई या शेळ््या घेऊन वानवाडी शिवारातील शेतात गेल्या होत्या. त्यांचे पती पाहुण्याकडे बाहेरगावी गेले होते. दोन्ही मुले लग्नासाठी बाहेरगावी होते. दुपारी चारच्या सुमारास पती दत्ता खुपसे घरी परत आले. लोनाजी घरी परतला. शेळ््या घरी होत्या. आई कुठे आहे? याची चौकशी झाल्यानंतर लोनाजी तिचा शोध घेण्यासाठी शेतात गेला. शेताजवळ लाकडाचा ढीग जळून खाक झाला होता. ज्यामधून जळका वास लोनाजी यांना झोंबला.

सदरील शेत हे हनुमंत दिगंबर खूपसेचे आहे. या जळालेल्या लाकडी ढिगात मानवी हाडे व बांगड्या आढळल्या. त्यांनी ताबडतोब घटनेची माहिती तामसा पोलिसांना दिली. आरोपी हनुमंत खुपसे हा दिवसभर शेतात होता. त्यानेच लक्ष्मीबाई यांचा खून करून त्यांचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जाळल्याची शक्यता वाढली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, फौजदार बालाजी किरवले यांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवून संशयित हनुमंत खुपसे याला रात्रीच ताब्यात घेतले.

आरोपीने शेतीच्या वादातून चुलतीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत जाळल्याची तक्रार जबाबात दिली. या प्रकरणाचा छडा लावून खुनाचे कारण शोधण्याचे काम पोलिस करीत आहेत. या घटनेनंतर पोलिस उपाधीक्षक अर्चना पाटील या घटनास्थळ व तामसा पोलिस ठाण्यात तपासकामी मार्गदर्शन करण्यासाठी हजर होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या