17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeक्राइमगळफास देवून युवकाचा खून

गळफास देवून युवकाचा खून

एकमत ऑनलाईन

नांदेड : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या असर्जन भागात पाईपलाईनच्या शेजारी एका युवकास गळफास देवून खुन केला असल्याची घटना रविवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच सोमवारी पहाटे उपविभागीय अधिकारी भोरे, पोलिस निरिक्षक घोरबांड यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विष्णूपुरी येथील हरमितसिंघ रेखासिंघ पुजारी वय २१ वर्षे यांचे परिसरात वराह येत असल्याच्या कारणावरून एका युवकासोबत सोमवारी वाद झाला. या कारणावरून हरमितसिंघ याच्यात असर्जन भागातील पाईपलाईन परिसरात नेवुन त्यास वराहाला पकडण्यासाठी तयार केलेला फासा लटकवुन हरमितसिंघ याचा गळा आवळुन जुन्या भांडणाच्या कारणावरून व वराह परिसरात येण्याच्या कारणावरून खुन करण्यात आला आहे. या प्रकरणी या घटनेची माहिती मिळताच सोमवारी पहाटे उपविभागीय अधिकारी भोरे पोलिस निरिक्षक घोरबांड घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. सदर प्रकरणी मयताचे वडील रेखासिंघ पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर खुन जुन्या वादातुन झाला असल्यासचे पोलिसांनी सांगीतले. विष्णुपूरी परिसरात या प्रकरणातील आरोपीचे वराह येत असल्याचे कारण फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. रेखासिंघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कौठा भागातील चार जणांविरू ध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी जुना वाद पुढे करून सोमवारी वाद झाला असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. विष्णूपुरी परिसरात दिवसाढवळ्या लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. या भागात कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्यात यावी. अशी मागणी गावक-यांच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर युवकाचा खुन जुन्या वादावरून झाला असल्याची पोलिसांनी सांगीतले.

फ्रान्सवरून २० मेट्रीक टन ऑक्सिजनसह आयएनएस त्रिकंड मुंबईत दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या