23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडविष्णुपुरीच्या बाजीरावचा खून

विष्णुपुरीच्या बाजीरावचा खून

एकमत ऑनलाईन

नांदेड : विष्णूपुरी येथिल व्यापारी बाजीराव हंबर्डे यांचा अज्ञात इसमाने खुन करून मृतदेह दुचाकीसह हडको भागातील वाघाळा रस्त्यावर फेकून दिल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णुपुरी येथील व्यापारी तथा देशमुख ट्रेडर्सचे संचालक बाजीराव देशमुख हंबर्डे यांचा मृतदेह गुरुवारी १७ रोजी पहाटेच्या सुमारास हाडको वाघाळा मुख्यमार्गावर आढळून आला. प्रथमदर्शी हा अपघात की घातपात याबद्दल संशय होता . घटनेची माहिती मिळताच आ. मोहनराव हंबर्डे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

या प्रकरणी प्रविण पंडितराव हंबर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह ताब्यात घेवून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली. विष्णुपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव देशमुख हंबर्डे यांचा मृतदेह गुरुवार पहाटेच्या सुमारास हडको वाघाळा मुख्यमार्गावर आढळून आला. शेजारी दुचाकी क्र. एमएच २६, बीजी ७५४३ पडलेल्या अवस्थेत आढळून आली. हा अपघात वाटावा अशा अवस्थेत अंगावरील शर्ट काढून टाकण्यात आला होता.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे विष्णुपुरी परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तरीय तपासणी नंतर विष्णूपूरी येथे सायंकाळी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगीतले. मयत बाजीराव हंबर्डे यांचा खून कोणत्या कारणांमुळे झाला हे अध्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे शंका कुशंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक अशोक घोरबाड पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये:आ.हंबर्डे
मागील काही दिवसापासून दक्षिण नांदेड तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.यावरून पोलिसांची निष्क्रीयता दिसून येत आहे.यात आता बाजीराव हंबर्डे या जवळच्या व चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा अज्ञात आरोपींनी खुन केला आहे.ही अंत्यत गंभीर बाब आहे.यासह परिसरात अनेक गंभीर घटना चालूच आहेत.हे योग्य नाही.पोलिसांनी आता गाफिल न राहता या घटनेचा छडा लवकर लावावा. गुन्हेगारांचा बंदोबंस्त करावा, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल.सत्ताधारी आमदारास पोलिसांनी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये असा इशाराच आ.मोहन हंबर्डे यांनी ग्रामिण पोलिसांना दिला आहे.

ओबीसी आरक्षणासाठी रास्तारोको आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या