नांदेड : पाच भावामध्ये वडीलोपार्जीत जागेचा वाद होता या वादातुन शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास एकाचा चाकुने व कु-हाडीने भोसकून खुन केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी पोलीसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे़ गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.
शहरातील गाडीपुरा भागात पाच भाऊ राहात होते़ वडीलोपार्जीत त्यांची जागा असल्यामुळे वाटणी रितसर झाली नसल्याची तक्रार न्यायालयामध्ये खटला सुरु होता. एका भावाने सदर जागा विक्रीसाठी काढली होती़ त्यामुळे शुक्रवारी भावाभावामध्ये वाद सुरु झाला.
दुपारी ३ च्या सुमारास श्याम प्रकाशसिंग परमार वय ३८ वर्षे रा़ गाडीपुरा यास चाकुने पोटात भोसकून कु-हाडीने मारहाण केली़ यात तो जागीच गतप्राण झाला़ घटनेची माहिती मिळताच इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी घटनास्थळी भेट घेतली़ यातील आरोपी मनोज राजेंद्रसिंघ परमार यास पोलीसांनी ताब्यात घेतले असून मयताच्या पत्नी व नातेवाईकांची फिर्याद देण्याची प्रक्रिया इतवारा पोलीस ठाण्यात सुरु होती़ याप्रकरणातील अणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून फिर्यादीनुसार व तपास केला जाईल असे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी सांगीतले़ याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.