30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड प्रेमसंबंधातून केला ‘त्या’ दिव्यांग व्यक्तिचा खुन

प्रेमसंबंधातून केला ‘त्या’ दिव्यांग व्यक्तिचा खुन

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात उशीराने दाखल झालेल्या ‘त्या’ अपंग व्यक्तिचा खुन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने करण्यात आल्याचा उलघडा इतवारा ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ४८ तासात केला आहे.यातील तीन आरोपींना गजाआड करण्यात आले असून गुन्ह्यातील ऑटोरिक्षाही ताब्यात घेण्यात आला आहे.

या घटनेबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,सय्यद अकबर अली यांनी दि.१७ रोजी इतवारा पोलिस ठाण्यात दि.१४ फेब्रुवारीपासून त्याचा अंपग भाऊ सय्यद मनसबअली सय्यद मुमताजअली वय ४६ हा राहते घरातून गेला आहे.अशी तक्रार दिली होती.नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी मयत सय्यद मनसबच्या घरी भेट देऊन विचारणा केली होती. दि.१८ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बोढार पुलाखाली एक ४६ वर्षीय अपंग माणसाचे प्रेत सापडले.याबाबत अज्ञात मारेक-यांनी त्याचा खुन केल्याचा गुन्हा १९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलिसांनी दाखल केला.तर तपास सपोउपनि शेख आसद यांच्याकडे होता.

इतवारा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे यांनी पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या सहकारी पोलिसांना या कामासाठी जबाबदारी दिली. त्यात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे,पोलीस अंमलदार गणपत पेदे,विक्रम वाकडे, जिनेवाड, गायकवाड,शिंदे, देशमुख,शेख सत्तार,चाऊस,हंबर्डे आदी अनेक पोलिसांनी नांदेड सायबर सेलच्या माध्यमाने प्रकरण तपास कार्याला गती दिली.

अखेर या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली.यात मनसबला अपंगतेचा झटका आल्यानंतर त्याची पत्नी हैद्राबाद येथे राहत होती.तेथे तिने मोहंमद जफर रा. गनिमापूरा नांदेड यांच्या सोबत सुत जमवले. मोहमंद आणि मनसबची पत्नी यांना लग्न करायचे होते.पण मनसब अडचण ठरत होता.त्याचा काटा काढण्यासाठीच जफर दि.११ फेब्रुवारी रोजी नांदेडला आला.नियोजन करून त्याने आपल्या दोन साथीदारांसह १४ फेब्रुवारी रोजी मनसबला एका ऑटोमध्ये बसवून शहरातून अनेक जागी फिरवत दारू पाजली आणि बोंढार पुलावर रात्री १० ते ११ यावेळेत पोहचले.येथे त्याला चाकूने भोकसून त्याचा खून करून प्रेत पुलाजवळचा रस्त्याच्या कडेला फेकून फरार झाले.प्रेत सापडल्या नंतर संशयाच्या आधारावर इतवारा पोलीस काही जणांची तपासणी दररोज करीत होते त्यात एका आरोपीचा समावेश होता.

यासर्व प्रकरणाची हाताळणी करणारे डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी समोर येणा-या पुराव्याची साखळी तयार केली.त्या साखळीचा सर्व आलेख आपल्या वरिष्ठ अधिका-यांकडे मांडून मार्गदर्शन घेत परिश्रम करून तीन आरोपींना गजाआड केले आहे.इतर दोघांची नावे कळू शकली नाहीत. सोबतच मनसबला फिरवतानाचा ऑटो जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक शेख असद यांच्याकडे असून त्यांचे पथक मनसबच्या पत्नीची तपासणी करण्यासाठी हैद्राबाद येथे रवाना झाले आहे. इतवारा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.

रस्त्यामुळे बाळाचा जीव गेला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या