34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोनाची मुसंडी; १५० जण बाधीत

नांदेड जिल्ह्यात कोरोनाची मुसंडी; १५० जण बाधीत

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या दोन ते तीन दिवसात कोरोनाचा आलेख वाढतच आहे.शनिवारी आलेल्या अहवालानूसार कोरोनाने जोरदार मुसंडी मारत १५० चा आखडा गाठला आहे. १ हजार ३१८ अहवालापैकी १ हजार १६० निगेटिव्ह आले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येने नांदेडच्या नागरिकांची धडकी वाढत आहे.दोन ते तील दिवस शंभरी गाठल्यानंतर शनिवारी कोरोना अहवालानुसार १५० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७३ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ७७ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ९२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या १ हजार ३१८ अहवालापैकी १ हजार १६० अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २४ हजार ३०९ एवढी झाली असून यातील २२ हजार ७०४ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ७८५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील २३ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवार ६ मार्च रोजी सिद्धार्थनगर देगलूर येथील ६५ वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ६०५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ८, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ६१, किनवट कोविड रुग्णालय २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ६, खाजगी रुग्णालय १५ असे एकूण ९२ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सु२ट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९३.३९ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ५0, देगलूर तालुक्यात ४, कंधार १, मुदखेड २, नायगाव १, नांदेड ग्रामीण १, हिमायतनगर ६, लोहा ३, मुखेड १, उमरी 4 असे एकुण ७३ बाधित आढळले. अ‍ॅटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ४८, अधार्पूर तालुक्यात ८, देगलूर १, किनवट ७, मुखेड २, औरंगाबाद १, नांदेड ग्रामीण १, बिलोली २, धमार्बाद ३, हिमायतनगर २, पुसद २ असे एकूण ७७ बाधित आढळले. जिल्ह्यात ७८५ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ४९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ६१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ४७, किनवट कोविड रुग्णालयात ३४, मुखेड कोविड रुग्णालय ९, हदगाव कोविड रुग्णालय 3, महसूल कोविड केअर सेंटर ५९, देगलूर कोविड रुग्णालय ५, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २८५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १४७, खाजगी रुग्णालय ८९ आहेत. शनिवार ७ मार्च २0२१ रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १४0, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १२ एवढी आहे.

हे भगवान! डॉक्टर आहेत का कसाई?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या