36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडमाझं गाव, सुंदर गाव अभियानास सकनुर येथून प्रारंभ!

माझं गाव, सुंदर गाव अभियानास सकनुर येथून प्रारंभ!

एकमत ऑनलाईन

मुखेड : पंचायत समिती मुखेड अंतर्गत माझं गाव,सुंदर गाव या अभियानाची सुरुवात सकनूर ग्रामपंचायत येथून झाली.  गाव फेरी,शासकीय इमारत पाहणी,ओला सुखा कचरा संकलन कुंड्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजी माजी पदाधिका-यांसह गावक-यांनी आपले गाव आदर्श गाव करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सदस्या केवळबाई पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी.के भालके,माजी जि.प.सदस्य चंद्रकांत घाटे, माजी सरपंच बालाजी पाटील,विस्तार अधिकारी येवते ,गर्जे ग्रामसेवक संजय जाधव होनवडजकर ,सचिन पांढरमिशे ,अहिरे ,कृषी अधिकारी देशमुख उपस्थित होते. अभियानाबद्दल मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारीटी.के. भालके  म्हणाले की गावात प्रवेश करताच जे पहायला मिळाले, जे ऐकायला मिळाले त्यात काहीच तफावत जाणवत.

याचाच अर्थ मागील ग्रामपंचायतमध्ये अतिशय नियोजनबध्द काम झाले आहे .ज्या अर्थी इतका वेळ होऊनही इतके लोक कार्यक्रमास लोक उपस्थित आहेत त्या अर्थी हे गाव निश्चितच सुंदर होणार यात काही शंका नाही फक्त घोषणा होणे बाकी आहे.या कार्यक्रमात घाटे ,येवते ,गर्जे  यांनी आपले विचार मांडले. तर माजी सरपंच बालाजी पाटील यांनी निश्चितच गाव सुंदर करून सकनूर गाव जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून पुढे येईल अशी हमी दिली. या कार्यक्रमास शेजारच्या ५ ते ६ गावचे आजी माजी सरपंच, लोकप्रतिनिधी,ग्रामसेवक उपस्थित होते.   कार्यक्रम यशवी करण्यासाठी गणेश पाटील लामतुरे,मुख्याध्यापक बालाजी पाटील, श्याम लामतुरे,परशराम कारळे, माधव जाधव, बालाजी बोईनवाड,बाबाराव लामतुरेसर,शिवाजी कारळे,बापूराव लामतुरे,ग्रामसेवक संजय पाटील यांनी परिश्रम घेतले.आभार अनारगट्टे यांनी मानले.

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात बैठकीदरम्यान मोठा वाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या