नांदेड : एसबीआय बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याची घटना देगलूर शहरात १ जूलै रोजी दुपारी घडली़ मात्र पोलिस घटनास्थळी वेळेवर पोहचल्यामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला, यावेळी आरोपींनी छºर्याची पिस्तोल, दोन लोखंडी रॉड व दुचाकी सोडुन पोबारा केला.
देगलूर शहरातील मोंढा कॉर्नर परिसरात एसबीआय बँकेची शाखा आहे़ दि़ १ जुलै रोजी बँकेच्या आजूबाजुला कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला़ बँक फोडण्यासाठी आरोपींनी सोबत काही हत्यारेही आणली होती़ परंतू या घटनेची माहिती मिळताच देगलूर ठाण्याचे पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांना मिळताच ते आपल्या सहका-यांसह घटनास्थळी वेळेवर पोहचले, पोलिसांना पाहताच आरोपींनी पोबारा केला़ घटनास्थळावरून छºर्याची पिस्तोल, दोन लोखंडी रॉड व दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहे.
Read More कंधार शहरात तीन दिवसाचा ‘ जनता कर्फ्यू ‘