23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडनांदेड भूषण पुरस्कार अ‍ॅड. एकताटे यांना जाहीर

नांदेड भूषण पुरस्कार अ‍ॅड. एकताटे यांना जाहीर

एकमत ऑनलाईन

नांदेड : सामाजिक चळवळीत सहभाग नोंदविणारे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मिलिंद एकताटे यांना वकिली क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ष २०२० चा नांदेड भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पं. दिनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रोख रु. ५०००, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र देऊन नांदेड भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते होणार कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे, असे डॉ. सचिन उमरेकर व अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी सांगीतले.

अ‍ॅड.एकताटे हे बत्तीस वषार्पासून वकिली व्यवसाय करत असून त्यांनी दोन वेळा नांदेड अभिवक्ता संघात अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. या शिवाय सतत तीन वेळा अभिवक्ताचे सचिव म्हणून निवडून आले होते. यादरम्यान राष्ट्रीय कायदेविषयक परिसंवादाचे नांदेड येथे दोन वेळेस आयोजन करण्यात आले. २०१६ या वर्षी जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या लोक अदालतीत महाराष्ट्रात उच्चांकी खटल्यांचा निवाडा झाल्यामुळे अध्यक्षपदाची कारकीर्द गाजली. महाराष्ट्र शासनातर्फे मतीमंद व मूकबधिर विद्यालयात झालेल्या नियुक्ती दरम्यान शासनाकडे अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करून समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून दिला.

नांदेड न्यायालयाला पुरेशी जागा मिळावी यासाठी २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्र्याकडे आग्रहाची मागणी करून कौठा भागात सोळा एकर जागा उपलब्ध करून घेतली. अनेक मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करून वकिलांना न्यायाधीश पदावर बसवण्याचे मोलाचे कार्य केले. महाविद्यालयीन जीवनात असताना एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. विधी महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवत असताना तीनदा मराठवाडा विभागात जेतेपद मिळवून दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या