26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले

नांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, कालपासून जिल्ह्यातील विविध भागात अवकाळीने हजेरी लावली. तर सध्या मुंबईच्या किना-यावर घोंगावणा-या तौत्के चक्रीवादळाचा काहीसा परिणाम नांदेड जिल्ह्यावरही झाला आहे. मंगळवारी दि.१८ रोजी अधून-मधून विश्रांती घेत वादळी वा-यासह अवकाळी पावसाने नांदेडला झोडपले. शहर परिसरातही दिवसभर अचानक बरणणा-या वादळी पावसामुळे नांदेडकरांची पुरती तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व हवामान खात्याने जिल्ह्यात १३ ते १६ मे दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार दि.१६ व १७ रोजी जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला होता. दरम्यान या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील भाजीपाला फळबागांचे अतोनात नुकसान झाले तर अनेक शेतीपिक वादळी वा-याने जमीनधोस्त होत आहे यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

सध्या गुजरात, कोकण, मुंबईच्या किना-यावर सध्या तौत्की चक्रीवादळ घोंगावत असून, मागच्या दोन दिवसांपासून मुंबईसह किनापट्टी लगतच्या काही जिल्ह्याना या वादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, यामुळे प्रचंड हानी झाली आहे. तर सदरील ठिकाणची रस्ते वाहतूक , विमान सेवा, जलमार्ग सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. तर या तौत्के वादळाचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यालाही काही प्रमाणात बसला असून मंगळवार दि.१८ रोजी नांदेड शहरात दुपारपासून वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दुपारपासूनचं शहर व परिसरात अधून- मधुन सुसाट्याच्या वा-यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसत होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास मात्र शहर परिसरात जोराचा पाऊस झाला.दरम्यान जिल्ह्यातील काही भागात सुसाट्याच्या वा-यामुळे झाडे कोसळली तर अनेक वस्त्यामधील घरावरील पत्रे उडाल्याच्या घडल्या असून, यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पण अजूनही या वादळाचा दोन दिवस राज्याला चांगला तडाखा बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसाने बाहेर पडलेल्या शहरातील नागरीकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तविला होता, तो खरा ठरला आहे. तर या अवकाळी पावसासोबत शहरातील अनेक भागात नेहमीप्रमाणे विजेचा लपंडाव सुरू असल्याचे दिसून आले. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आणखी दोन दिवस काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाकडून नागरिकांनी करण्यात आले आहे.

लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या